लाईफस्टाईल

Mahashivratri 2026 : हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त शेअर करा खास मराठी शुभेच्छा

या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे.

किशोरी घायवट-उबाळे

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानली जाणारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरू झाली आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धाळू भक्त पहाटेपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावतात. भगवान शिवला दूध, बेलपत्र, फुले अर्पण करून अभिषेक केला जातो. अनेक भक्त या दिवशी कडक उपवास करतात आणि रात्रभर जागरण करून भजन, कीर्तन आणि शिवनामस्मरण करतात. महाशिवरात्री हा केवळ धार्मिक सण नसून भक्तांच्या श्रद्धा, संयम आणि अध्यात्मिक शक्तीचा अनुभव देणारा उत्सव आहे. या दिवशी शिवभक्त भगवान शिवची पूजा करून आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना करतात.

महाशिवरात्री शुभेच्छा मेसेज

  • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान शिव तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणो.

  • हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

  • शिवाच्या कृपेने तुमचे जीवन आनंद, आरोग्य आणि यशाने भरून जावो. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

  • भगवान शिव तुमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करो.

  • या महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि यश घेऊन येवो.

  • महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान शिव तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट देवो. हर हर महादेव!

  • महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, आयुष्य आनंदाने फुलून जावो.

  • शिवच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होवोत आणि यश तुमच्या पायाशी येवो.

  • या महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि आनंद भरून राहो.

  • हर हर महादेव! भगवान भोलेनाथ तुमच्या कुटुंबावर नेहमी कृपादृष्टी ठेवो.

  • महाशिवरात्री निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Pune : नशेच्या विळख्याला आता सरकारी घेराव! अमली पदार्थांविरोधात १९ सरकारी विभाग एकत्र येणार!

Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

Amul Price Hike : दिवाळीच्या तोंडावर अमूलचे तूप-लोणी महागले; नवे दर किती?

दिवाळी बोनसवरून कर्मचारी आक्रमक! नवी मुंबईत ४५ हजार रुपये, पण ठाण्यात केवळ २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आंदोलनाचा इशारा

कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर