AI Generated Image
लाईफस्टाईल

काय आहे Urban Craft फॅशन ट्रेंड? महाराष्ट्रात का होत आहे लोकप्रिय? जाणून घ्या रोचक माहिती

... हे फक्त कपड्यांच्याच बाबतीत नाही तर बॅग, पर्स यांच्याबाबतीतही दिसून येते. फॅशनच्या या ट्रेंडला Urban Craft ट्रेंड असं म्हटलं जातयं, चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

Kkhushi Niramish

तुम्ही आसपास पाहिले तर तुम्हाला सहज दिसून येईल, तरुणांना अनोख्या पारंपारिक नक्षीकामांमध्ये तयार केलेले आधुनिक स्टाईलचे कपडे घालणे अधिक पसंत पडत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वारली पेंटिंग असलेले जीन्सवरचे टॉप्स किंवा कुर्ते. तसेच आदिवासी चित्रशैली असलेले टी शर्ट्स, तसेच फ्रॉक, स्कर्ट इत्यादी... हे फक्त कपड्यांच्याच बाबतीत नाही तर बॅग, पर्स यांच्याबाबतीतही दिसून येते. फॅशनच्या या ट्रेंडला Urban Craft ट्रेंड असं म्हटलं जातयं, चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा संगम

महाराष्ट्रातील नव्या पिढीत झपाट्याने लोकप्रिय होत असलेला अर्बन क्राफ्ट ट्रेंड हा पारंपरिक आणि आधुनिकतेचा अनोखा संगम आहे. याला आत्ताच्या पिढीच्या भाषेत याला फ्यूजन असेही म्हणू शकता. आपल्या आई-आजीच्या काळातील ट्रेंडिंग डिझाईन, कला कुसरीचे पारंपारिक कपडे आधुनिक स्टाईलच्या कपड्यांमध्ये रिडिझाईन करून घालणे. त्यामुळे एकाच वेळी पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही गोष्टी साधता येतात. त्यामुळे शहरातील युवक आणि युवतींमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.

अर्बन क्राफ्ट (Urban Craft ) ट्रेंड्सची वैशिष्ट्ये

  • पारंपारिक लोककला, हस्तकला, चित्रकला, विणकाम तसेच अन्य ग्रामीण हस्तकलेचा शहरी वापर किंवा शहरातील लोकांना याची ओळख होते. जसे की एथनिक वेअर कपड्यांमध्ये जगप्रसिद्ध वारली चित्रकलेचे डिझाईन पाहायला मिळते. आणखी उदाहरण द्यायचे झाले तर पारंपारिक खणाच्या साडीचे आधुनिक स्टाईलचे स्कर्ट, फ्रॉक किंवा ड्रेस तयार करणे.

  • या ट्रेंडमुळे स्थानीय हस्तकलेचे महत्त्व वाढून ग्रामीण आणि शहरी भागातील कपड्यांमधील फॅशन ट्रेंड्सची दरी कमी होते.

  • पारंपरिक वारसा जपणाऱ्या वस्त्रांचा फ्युजन स्टाईलमध्ये पुनर्विचार

  • तसेच हा ट्रेंड इको-फ्रेंडली आहे.

  • युनिक डिझाइन्स हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक उत्पादन हे अनोखे आणि वैयक्तिक असते.

कुठे घालू शकता?

तुम्हाला ऑफिस, रेग्युलर टी-कॉफी पार्टी किंवा मार्केटमध्ये फिरायला जाताना, एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हे ड्रेस तुम्ही वापरू शकता. त्यामुळे देखील हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.

महाराष्ट्रातील हे अर्बन क्राफ्ट (Urban Craft ) आहेत लोकप्रिय

पैठणी, इलकल साड्या यांचा पुनर्वापर करून तयार केलेले टॉप्स, स्कर्ट्स, जॅकेट्स

वारली, गोंध, सौरा अशा आदिवासी चित्रशैलींचा टी-शर्ट्स व बॅग्सवर वापर

कोल्हापुरी चपला, चामड्याच्या बॅग्स यांना हाय-एंड स्ट्रीट फॅशनमध्ये स्थान

सोशल मीडियामुळे अल्पावधीतच ट्रेंड लोकप्रिय

अर्बन क्राफ्ट हा ट्रेंड सोशल मीडियामुळे खूप अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. विशेषतः कॉलेजला जाणाऱ्या युवक युवतींमध्ये हा ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे. #UrbanCraftIndia, #SustainableFashion हे हॅश टॅग इन्स्टासह सर्व सोशल मीडियावर पॉप्यूलर होत आहे.

स्टार्ट्अप्समुळे अधिक पाठबळ

काही नवीन स्ट्रार्टअप्सने अर्बन क्राफ्ट ट्रेण्ड्सच्या कपड्यांचे ब्रँड्स लाँच केले आहेत. यामुळे या फॅशन ट्रेंडला आणखी पाठबळ मिळाले आहे. किंबहुना असे म्हणता येईल हे नवीन स्टार्टअप्स हा ट्रेंड पुढे नेत आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा