थंडगार डेझर्ट! घरच्या घरी बनवा स्टफ्ड मँगो कुल्फी; उन्हाळ्यासाठी खास रेसिपी (Photo-@binjalsvegkitchen)
लाईफस्टाईल

थंडगार डेझर्ट! घरच्या घरी बनवा स्टफ्ड मँगो कुल्फी; उन्हाळ्यासाठी खास रेसिपी

बाजारात मिळणाऱ्या कुल्फीऐवजी आता घरच्या घरीच आंब्यामध्ये स्टफ्ड केलेली "मँगो कुल्फी" हा एक वेगळा आणि आकर्षक पर्याय ठरतो. ही रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर दिसायलाही खूप आकर्षक आहे.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा म्हटलं की आंब्याचे विविध पदार्थ आठवतात. त्यातच थंडगार आणि गोड कुल्फीची मजा काही औरच असते. बाजारात मिळणाऱ्या कुल्फीऐवजी आता घरच्या घरीच आंब्यामध्ये स्टफ्ड केलेली "मँगो कुल्फी" हा एक वेगळा आणि आकर्षक पर्याय ठरतो. ही रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर दिसायलाही खूप आकर्षक आहे.

साहित्य :

  • पिकलेले मोठे आंबे

  • फुल-फॅट दूध

  • कंडेन्स्ड मिल्क

  • साखर (चवीनुसार)

  • केशर

  • सुका मेवा (ऐच्छिक)

  • बर्फ आणि मीठ (फ्रीझिंगसाठी)

कृती :

आंब्याचा वरचा भाग कापून त्यातील बाठा काळजीपूर्वक काढा. आंबा पूर्णतः कापला जाणार नाही याची काळजी घ्या. एका भांड्यात फुल-फॅट दूध उकळा आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण अर्धं होईपर्यंत आटवा. त्यात साखर आणि केशर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. इच्छेनुसार सुका मेवा घालू शकता. तयार मिश्रण थोडं थंड झाल्यावर ते कापून ठेवलेल्या आंब्यामध्ये भरून घ्या.

हा आंबा बर्फ आणि मीठ असलेल्या भांड्यात ठेवा किंवा थेट फ्रीजरमध्ये ६ ते ८ तास सेट होऊ द्या. सेट झाल्यानंतर आंब्याची साल काढून गोल काप करून सर्व्ह करा.

टिप्स :

  • हापूस किंवा कोणत्याही प्रकारचा गोड आंबा वापरल्यास चव अधिक छान येते.

  • कुल्फी मिश्रण खूप पातळ ठेवू नका.

  • फ्रीझिंगसाठी किमान ६ ते ८ तास द्या.

  • सर्व्ह करताना पिस्ता/बदाम घालून सजवा.

  • अधिक रिच फ्लेवरसाठी थोडी वेलदोडा पूड घालू शकता.

घरच्या घरी बनवलेली मँगो कुल्फी ही उन्हाळ्यातील परफेक्ट डेझर्ट ठरते. आंबा आणि कुल्फीचा हा अनोखा संगम मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता