सोशल मीडियावर एक विचित्र आणि चिंताजनक स्किनकेअर ट्रेंड सध्या वेगाने व्हायरल होत आहे. 'मेंस्ट्रुअल मास्किंग'(Menstrual Masking). यात महिला आपल्या पीरियड्सच्या रक्ताला फेस मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावत आहेत आणि त्यामुळे त्वचा उजळते किंवा ग्लो वाढतो, असा दावा करतात. पण या ट्रेंडवर तज्ज्ञांनी मोठा धोक्याचा इशारा दिला आहे.
त्वचारोगतज्ज्ञांचा स्पष्ट इशारा
एचटी लाइफस्टाइलशी बोलताना, बेंगळुरूतील Aster CMI हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शिरीन फर्टाडो यांनी हा ट्रेंड पूर्णपणे असुरक्षित, अस्वच्छ आणि वैज्ञानिकदृष्ट्या असिद्ध असल्याचे सांगितले.
डॉ. फर्टाडो म्हणाल्या, "मेंस्ट्रुअल मास्किंग म्हणजे स्वतःच्या पीरियड्सच्या रक्ताला चेहऱ्यावर लावणे, ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. पीरियड्सचे रक्त निर्जंतुक नसते. त्यात बॅक्टेरिया, फंगस आणि विविध जंतू असतात. हे चेहऱ्यावर लावल्यास इन्फेक्शन, ऍलर्जी, पुरळ, जळजळ किंवा गंभीर त्वचारोग उद्भवू शकतात. विशेषतः मुरुम, ओपन पोर्स किंवा त्वचेवर जखमा असतील तर अशा समस्या येऊ शकतात."
पीरियड्सच्या रक्तात काय असते?
त्या पुढे म्हणाल्या, "पीरियड्सच्या रक्तात मेलेले ऊतक (dead tissue), जळजळ वाढवणाऱ्या पेशी आणि शरीरातील कचरा असतो. यामुळे त्वचेची स्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते."
त्या स्पष्ट करतात की PRP ट्रीटमेंटमध्ये:
रक्त काढले जाते
ते प्रक्रिया (process) केले जाते
निर्जंतुक केले जाते
आणि सुरक्षितरीत्या लावले जाते
पण मेंस्ट्रुअल मास्किंगमध्ये कोणताही वैज्ञानिक नियम किंवा सुरक्षा प्रक्रिया नाही.
हा ट्रेंड धोकादायक का?
त्वचा उजळते किंवा ग्लो वाढतो, याचा एकही वैज्ञानिक पुरावा नाही
गंभीर इन्फेक्शन, ऍलर्जी आणि दीर्घकालीन त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त
DIY पद्धतीत स्वच्छता आणि सुरक्षा पूर्णपणे गायब
डॉक्टरांचा सल्ला: व्हायरल ट्रेंडपासून दूर रहा
डॉ. फर्टाडो यांचा ठाम सल्ला - "व्हायरल स्किनकेअर ट्रेंडपेक्षा त्वचेची सुरक्षा आणि स्वच्छता महत्त्वाची. ग्लो मिळवायचा असेल तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध प्रोडक्ट्स, योग्य स्किनकेअर रूटीन आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा unsafe DIY ट्रेंडपासून दूर रहा."
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)