लाईफस्टाईल

‘मनी म्यूल’ व्हाल तर हाती पडतील बेड्या; स्कॅमरच्या रकमेची उलाढाल करणे धोकादायक

‘मनी म्यूल’ म्हणजे अशी व्यक्ती जी फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर कामांमधून मिळालेले पैसे जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे दुसऱ्यासाठी हस्तांतरित करणारे मध्यस्थ. स्कॅमर त्यांना कमिशनच्या बदल्यात सायबर गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यास...

रवींद्र राऊळ

मुंबई : ‘मनी म्यूल’ म्हणजे अशी व्यक्ती जी फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर कामांमधून मिळालेले पैसे जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे दुसऱ्यासाठी हस्तांतरित करणारे मध्यस्थ. स्कॅमर त्यांना कमिशनच्या बदल्यात सायबर गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यास आणि हस्तांतरित करण्यास प्रवृत्त करतात. फसवणूक करणाऱ्याची ओळख लपवण्यासाठी हे पैसे असे अनेक खात्यांमधून फिरवले जातात.

सायबर गुन्ह्यात पोलीस जेव्हा पीडित व्यक्तीची रक्कम कोणत्या खात्यात गेली याचा तपास करतात तेव्हा त्या खातेधारकाचा या गुन्ह्यात काहीच सहभाग नसल्याचे आढळते. मात्र, ती रक्कम स्कॅमरने पीडित व्यक्तीची रक्कम त्याच्या खात्यात जाईल, अशी व्यवस्था केलेली असते. असे ‘मनी म्यूल’ बहुतांशी खेड्यातील निरक्षर व्यक्ती असतात आणि ते कमिशन मिळवण्याच्या नादात स्कॅमरच्या जाळ्यात सापडलेल्या असतात.

सायबर गुन्हेगार अनेकदा अशा लोकांना ‘नोकरी’ किंवा ‘पैसे कमवण्याची संधी’ अशी वेगवेगळी आमिषे दाखवून फसवतात. हे पैसे त्यांनी आपल्या बँक खात्यात घेतले तर ते त्वरित ते पकडले जातील. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी ते काही लोकांकडून त्यांचे बँक खाते वापरण्याची परवानगी घेऊन, आलेली रक्कम ट्रान्स्फर करण्यास किंवा q संमिश्र पानावर

काय कराल?

-नोकरीच्या ऑफरची छाननी करा : पैशांच्या हस्तांतरणाशी संबंधित नोकऱ्यांपासून सावध राहा. कंपनीच्या किंवा व्यक्तीच्या वैधतेचा अभ्यास करा.

-आर्थिक माहितीचे रक्षण करा : कधीही बँक खात्याचे तपशील किंवा वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.

-संशयास्पद व्यवहारांची तक्रार करा : जर तुम्हाला ‘मनी म्यूल स्कीम’चा संशय असेल तर अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

काय टाळाल?

-खाती शेअर करू नका : कधीही इतरांना रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी तुमचे खाते वापरू देऊ नका.

-कमिशन नाकारा : शुल्कासाठी अनधिकृत पैसे हाताळण्याची ऑफर नाकारा.

-जोखीम जाणून घ्या : बेकायदेशीर निधी हस्तांतरित केल्याने गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली