लाईफस्टाईल

पावसाळ्यात 'जामुन शॉट्स'ने वाढवा हेल्थ आणि टेस्टचा तडका!

पावसाळा म्हणजे उबदार वातावरण, ओला सुगंध आणि धुंद हवामान असा एक काळ जेव्हा आपल्या मनाला काही खास आणि थंडावा देणारे पेय हवं असतं. याच पावसाळ्यात ज्यूस बारमध्ये एक पेय ट्रेंड करीत आहे, ते म्हणजे जामुन शॉट्स.

नेहा जाधव - तांबे

पावसाळा म्हणजे ओला सुगंध आणि धुंद हवामान, असा एक काळ जेव्हा आपल्या मनाला काही खास आणि थंडावा देणारे पेय हवं असतं. याच पावसाळ्यात ज्यूस बारमध्ये एक पेय ट्रेंड करीत आहे, ते म्हणजे जामुन शॉट्स. जांभळाच्या ताज्या आणि झकास चवीसह तयार होणारा हा शॉट, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या जांभूळ प्रेमींसाठी एक पर्वणी ठरतो.

पावसाळ्यात जांभळाच्या लाल आणि जांभळ्या रंगाच्या फळांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असतं, त्याचं खास चवदार ट्विस्ट म्हणजे जामुन शॉट्स. थोडं गोडसर, थोडं तिखट आणि थोडं आंबट ह्या सर्वांची एकत्रित चव अगदी भन्नाट असते. पुदिन्याचा ताजेपणा आणि लिंबाचा हलका स्पर्श एक खास अनुभव देतो, ज्यामुळे जामुन शॉट्सची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

का आहेत जामुन शॉट्स खास?

फक्त चवच नाही तर जांभळाचे हेल्थ बेनिफिट्सही जबरदस्त आहेत -

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

  • मधुमेहावर नियंत्रण ठेवतात.

  • वजन कमी करण्यात मदत करतात.

  • पचन आणि तोंडाचे आरोग्य सुधारतात.

  • आतड्यातील जळजळ कमी करतात.

  • पीसीओडीमध्ये उपयोगी ठरतात.

बनवायला सोपी रेसिपी

हे शॉट्स घरी बनवायला अगदी १५-२० मिनिटे पुरेशी आहेत.

लागणारे साहित्य

  • २५० ग्रॅम ताजे जांभूळ (इंडियन ब्लॅकबेरी)

  • ५-६ बर्फाचे तुकडे

  • १ टीस्पून काळे मीठ

  • १ टीस्पून पुदिन्याची पावडर किंवा ४-५ पुदिन्याची पाने

  • १ टेबलस्पून लिंबाचा रस

  • २ टेबलस्पून साखर (डायबेटिकसाठी साखर टाळा)

प्रेझेंटेशनसाठी

शॉट ग्लासेस

मीठ + लिंबाचा रस

कृती

  • जांभूळ २-३ वेळा स्वच्छ धुवा.

  • बिया काढून गर बाजूला ठेवा.

  • ब्लेंडरमध्ये जांभूळ गर, बर्फ, लिंबाचा रस, पुदिना, साखर आणि काळे मीठ घालून ब्लेंड करा.

  • शॉट ग्लासचा काठ लिंबाच्या रसात बुडवा आणि मीठ लावून डेकोरेट करा.

  • तयार मिक्स ग्लासमध्ये ओता आणि लगेच सर्व्ह करा.

स्टाइलमध्ये सर्व्ह करा!

जामुन शॉट्स पार्टीत, फ्रेंड्स गेट-टुगेदरमध्ये किंवा अगदी घरी रिलॅक्स टाइममध्ये अप्रतिम वाटतात. ग्लासच्या काठावर पुदिन्याची पानं किंवा लिंबाचा स्लाइस ठेवला तर ड्रिंक दिसायलाही आकर्षक होतो.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती