अलार्म बंद करून पुन्हा झोपता? सकाळी वेळेत उठण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पाहा 
लाईफस्टाईल

अलार्म बंद करून पुन्हा झोपता? सकाळी वेळेत उठण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पाहा

सकाळी अलार्म वाजल्यानंतर पुन्हा झोपण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात घाईगडबडीत होते. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर सकाळी वेळेत उठणे शक्य आहे.

Mayuri Gawade

सकाळी लवकर उठण्याचा अनेकांचा निर्धार असतो. पण अलार्म वाजल्यानंतर तो बंद करून पुन्हा झोपण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे घाईगडबडीत दिवसाची सुरुवात होते आणि कामावर किंवा कॉलेजला उशीरही होतो. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर सकाळी वेळेत उठणे शक्य आहे.

स्नूझ बटण टाळा

अलार्म वाजल्यानंतर स्नूझ बटण दाबण्याची सवय अनेकांना असते. पण त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. एकदा अलार्म वाजला की लगेच उठण्याचा प्रयत्न करा.

अलार्म दूर ठेवा

मोबाइल किंवा घड्याळ पलंगापासून थोडे दूर ठेवा. त्यामुळे अलार्म बंद करण्यासाठी उठावे लागेल आणि पुन्हा झोपण्याची शक्यता कमी होईल.

रात्री पुरेशी झोप घ्या

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे किंवा काम करणे टाळा. दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास सकाळी उठणे सोपे जाते.

झोपण्याची निश्चित वेळ ठरवा

दररोज साधारण एकाच वेळी झोपण्याची सवय लावा. त्यामुळे शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) व्यवस्थित काम करू लागते.

सकाळी हलका व्यायाम करा

उठल्यानंतर थोडा स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्यास शरीर ताजेतवाने होते आणि झोप पटकन उडते. तसेच उठल्यानंतर खिडकी उघडा किंवा सूर्यप्रकाशात काही वेळ उभे रहा. नैसर्गिक प्रकाशामुळे शरीराला जाग येण्यास मदत होते.

सकाळची छोटी दिनचर्या ठरवा

सकाळी चहा-कॉफी, चालणे किंवा आवडते संगीत ऐकणे अशा छोट्या सवयी ठेवा. त्यामुळे उठण्याची प्रेरणा मिळते.

नियमित सवयी बदलल्या तर सकाळी वेळेत उठणे शक्य होते.
अलार्म बंद करून पुन्हा झोपण्याऐवजी या छोट्या टिप्स वापरून पाहिल्या तर दिवसाची सुरुवात अधिक उत्साही होऊ शकते.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले