AI Generated Image
लाईफस्टाईल

महागड्या रिफाइंड तेलांपेक्षा पारंपरिक मोहरीचे तेल आहे खूप उत्तम, जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

मार्केटमध्ये जसे पॅकिंगचे तेल उपलब्ध झाले तसे रिफाईंड तेल बाजारात आले. पाहता पाहता या तेलांनी पारंपारिक तेलांची जागा घेतली. मात्र, बाजारीतल या महागड्या रिफाइंड तेलांपेक्षा पारंपारिक मोहरीचे तेल खूपच उत्तम असते.

Kkhushi Niramish

मार्केटमध्ये जसे पॅकिंगचे तेल उपलब्ध झाले तसे रिफाईंड तेल बाजारात आले. पाहता पाहता या तेलांनी पारंपारिक तेलांची जागा घेतली. मात्र, बाजारीतल या महागड्या रिफाइंड तेलांपेक्षा पारंपारिक मोहरीचे तेल खूपच उत्तम असते. याचे आरोग्यासाठी मोठे फायदे देखील होतात. रिफाइंड तेलामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, तर मोहरीचे तेल लठ्ठपणा, हृदयरोग आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.

आरोग्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर का?

महत्त्वाचे पोषक घटक

मोहरीचे तेल सॅच्युरेटेड फॅट, प्रथिने आणि मायक्रो-न्युट्रिएंट्स याने समृद्ध असते. त्यात असलेले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (PUFA) हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड

हे घटक प्रामुख्याने वनस्पतीजन्य तेलांमध्ये आढळतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (MUFA)

हे घटक वाईट कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

उच्च स्मोक पॉइंट

मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट (Smoke Point) 249°C असतो, त्यामुळे ते उच्च तापमानाला देखील चांगले राहते आणि त्यातील पोषणमूल्ये नष्ट होत नाहीत.

मोहरीच्या तेलाचे आरोग्यासाठी फायदे

हृदयासाठी उत्तम

रिफाइंड तेलांच्या तुलनेत मोहरीचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जाते.

मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करते

हे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि मधुमेहाचा धोका कमी करू शकते.

संक्रमणापासून संरक्षण

मोहरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

त्वचा आणि केसांसाठी लाभदायक: याचा वापर त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी केला जातो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी