Freepik
लाईफस्टाईल

National Dengue Day 2024: डेंग्यूची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या कसा टाळायचा हा आजार

Symptoms Of Dengue: डेंग्यू आजाराची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो.

Tejashree Gaikwad

Prevention of Dengue Disease: डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक अतिशय धोकादायक रोग आहे. या आजरामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. डासांमुळे होणारे इतर आजार कमी होत असले तरी डेंग्यूचा धोका झपाट्याने वाढत आहे. उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही महिन्यात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागतात. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, अर्ध्याहून अधिक जगाला डेंग्यूचा धोका आहे. डेंग्यू हा व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार आहे पण, प्लेटलेट्स झपाट्याने कमी झाल्याने हा आजार अधिक गंभीर होऊ लागतो. याच कारणाने जर डेंग्यूवर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा धोकाही असतो. या गंभीर आजराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो. याच निमित्ताने चला जाणून घेऊयात की डेंग्यूमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि ते हा आजार कसा टाळता येईल.

डेंग्यू आजाराची लक्षणे

डेंग्यूची लक्षणे डास चावल्यानंतर साधारण ३-४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात. ज्या लोकांना दुसऱ्यांदा डेंग्यू होतो त्यांना जास्त धोका जास्त असतो.

  • तीव्र ताप

  • तीव्र डोकेदुखी

  • डोळ्यांमध्ये दुखणे

  • स्नायू आणि हाडांमध्ये वेदना

  • उलट्या आणि मळमळ

  • हातावर सूज येणे

  • शरीरावर पुरळ येणे

जाणून घ्या कसा करायचं बचाव

फार झाडं असलेल्या ठिकाणी, कमी साफसफाई असलेल्या ठिकाणी जाताना पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला

  • कधीही झोपताना मच्छरदाणी लावूनच झोपा.

  • घराच्या दारे-खिडक्यांवर मच्छरदाणी बसवून घ्या.

  • संध्याकाळच्या वेळी दारे खिडक्या शक्यतो बनाड ठेवा.

  • डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बाजरात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा स्प्रे लावा.

  • डास अंडी घालू शकतील अशा जागा घरात असू नये याची काळजी घ्या.

  • घराभोवती घाण आणि कचरा साचणे टाळा.

  • भरपूर पाणी प्या आणि लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री