FPJ
लाईफस्टाईल

PCOS Awareness Month: पीसीओएसची समस्या नैसर्गिकपणे कशी हाताळायची? जाणून घ्या

भारतातील अनेक महिलांवर परिणाम करणाऱ्या पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आरोग्यसमस्येविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी व लोकांना शिक्षित करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये पीसीओएस जागरुकता महिना आयोजित केला जातो.

Tejashree Gaikwad

Polycystic Ovary Syndrome: भारतातील अनेक महिलांवर परिणाम करणाऱ्या पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आरोग्यसमस्येविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी व लोकांना शिक्षित करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये पीसीओएस जागरुकता महिना आयोजित केला जातो. अनियमित मासिक पाळी, पुरुष संप्रेरकांची वाढलेली पातळी आणि अंडाशयातील गळूसारखी गाठ म्हणजे ओव्हरीयन सिस्ट्स यांवरून ओळखल्या जाणाऱ्या पीसीओएसच्‍या परिणामी वजन वाढणे, अॅक्ने, केसांची अतिरिक्त वाढ व वंध्यत्वाशी निगडित समस्या यांसारखी लक्षणे दिसून येऊ शकतात. या लक्षणांच्या व्यवस्थापनासाठी अनुभवी न्यूट्रिशऩ व वेलनेस कन्सल्टन्ट शीला कृष्णामूर्ती सहज व्यवहारात आणण्याजोगे काही सल्ले देत आहेत, ज्यात संतुलित व स्वच्छ आहारपद्धती जपणे, शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरविणाऱ्या आणि आपल्या शरीराचे कार्य व एकूणच स्वास्थ सुधारणाऱ्या बदाम, हिरव्या पालेभाज्या आणि अखंड धान्यांसारखे नैसर्गिक पदार्थ यांचा आपल्या आहारात समावेश करणे यांवर भर देण्यात आला आहे. याबद्दल अधिक माहिती दिली आहे न्यूट्रिशऩ व वेलनेस कन्सल्टन्ट एस कृष्णास्वामी यांनी...

संतुलित आहाराला प्राधान्य द्या

पीसीओएसच्‍या व्यवस्थापनातील काही सर्वात महत्त्वाच्या पायऱ्यांपैकी एक पायरी म्हणजे फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, अखंड धान्ये, डाळी आणि बदामासारखा सुकामेवा यांसारख्या पोषक घटकांची रेलचेल असलेल्या पदार्थांनी समृद्ध अशी संतुलित आहारपद्धती जपणे. बदामांमधील आरोग्यास पोषक स्निग्धपदार्थ, प्रथिनं आणि फायबर यांच्यासारख्या भूक भागवणाऱ्या व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या घटकांमुळे फायदेशीर ठरतात. याशिवाय बदामांमध्ये मॅग्नेशियमही असते. हा एक असा पोषक घटक आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. खरेतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशऩल इऩ्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (आयसीएमआर-एनआयएन)ने भारतीयांसाठी दिलेल्या आहारविषयक मार्गदर्शक सूचनांमध्येही बदामांसारख्या पोषक सुक्यामेव्याची दखल घेण्यात आली आहे, जे चांगल्या आरोग्यासाठी दररोज खाता येतात.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांवर भर

शेंगा, अखंड धान्ये, बिया आणि बदामासारख्या सुक्यामेव्याच्या पदार्थांचा पर्याय निवडणे पीसीओएसच्‍या व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक आहे. कर्बोदकांनी समृद्ध असलेल्या ज्या पदार्थांसोबत बदाम खाल्ले जातात त्या पदार्थांचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम कमी करण्यामध्ये बदाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात व त्यायोगे फास्टिंग इन्स्लुलिन पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. खरेतर आपल्या दैनंदिन आहारामध्ये मूठभर बदामांचा समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहतेच पण त्याचबरोबर वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, एलडीएल कॉलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. हे सगळे घटक पीसीओएसची लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतात, त्यामुळे एकूण आरोग्यामध्येच सुधारणा होते.

नियमित शारीरिक व्यायाम

आपल्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये नियमित व्यायामाचा समावेश करणे पीसीओएसच्‍या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगाने चालणे, पोहणे, एखादा खेळ खेळणे किंवा योगासने यांसारखे व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि इन्सुलिन संवेदनक्षमता वाढते. या दोन्ही गोष्टी पीसीओएसच्‍या प्रभावी व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक आहेत.

शरीराची आर्द्रता टिकवा

आपले सर्वसाधारण स्वास्थ्य जपण्यासाठी भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक आहे. शरीराची आर्द्रता व्यवस्थित टिकवल्यास चयापचय व पचनासारख्या शरीराच्या क्रियांना मदत मिळते. रोज दिवसातून किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायले जाईल याची दक्षता घ्या, जेणेकरून तुमच्या शरीरातील आर्द्रतेची पातळी टिकून राहील आणि त्यातून पीसीओएसशी निगडित ब्लोटिंग व थकव्यासारख्या समस्या दूर होऊ शकतील.

ताणतणावांचे व्यवस्थापन

पीसीओएसच्‍या व्यवस्थापनासाठी ताणतणावांचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण मनावरील ताण वाढला की लक्षणेही बळावतात. त्यामुळे ध्यानधारणा, दीर्घश्वसन व श्वासाचे व्यायाम किंवा मेंदूला सजग ठेवणाऱ्या सवयी यांसारख्या ताण कमी करणाऱ्या गोष्टींना तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाचा भाग बनवा. यामुळे तुमच्या ताणतणावांची पातळी कमी व्हायला मदत होईल व एकूण स्वास्थ्याला आधार मिळेल.

पीसीओएसच्‍या व्यवस्थापनामध्ये तुमची मदत करण्यासाठी व तुम्हाला विशिष्ट मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची (एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्ट) मदत घ्या. अर्हताप्राप्त आहारतज्ज्ञ तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारनियमनामध्ये मदत करू शकतील.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी