१० मिनिटांत झटपट नाश्ता! चविष्ट 'पिझ्झा टोस्ट सँडविच'; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची पसंती 
लाईफस्टाईल

१० मिनिटांत झटपट नाश्ता! चविष्ट 'पिझ्झा टोस्ट सँडविच'; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची पसंती

फक्त १० मिनिटांत तयार होणारा झटपट आणि चविष्ट पिझ्झा टोस्ट सँडविच! मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीस उतरतो. सोपे साहित्य वापरून घरच्या घरी बनवा हेल्दी आणि कुरकुरीत नाश्ता

Mayuri Gawade

सकाळच्या धावपळीच्या वेळेत काहीतरी झटपट, चविष्ट आणि पोटभर खायला मिळालं तर दिवसाची सुरुवातच छान होते. विशेषतः मुलांना पिझ्झा खूप आवडतो, पण बाहेरचा पिझ्झा नेहमी खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. अशा वेळी घरच्या घरी तयार होणारा पिझ्झा टोस्ट सँडविच हा एक सोपा आणि झटपट पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य आणि अवघ्या १० मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही उत्तम आहे.

या सँडविचमध्ये ताज्या भाज्या, चीज आणि पिझ्झा सॉसचा वापर केला जातो, त्यामुळे चवही छान लागते आणि घरच्या घरी बनवल्यामुळे ते अधिक सुरक्षितही ठरते. पाहुणे घरी आले असतील किंवा संध्याकाळी हलकासा नाश्ता करायचा असेल तरीही हा पदार्थ पटकन तयार करता येतो.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस

  • कांदा

  • शिमला मिरची

  • टोमॅटो

  • मक्याचे दाणे

  • पिझ्झा सॉस

  • चीज

  • बटर

  • ओरेगॅनो

  • चिली फ्लेक्स

  • काळी मिरी पावडर

  • मीठ

कृती

सर्वप्रथम कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यामध्ये मक्याचे दाणे, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

एका ब्रेड स्लाइसवर बटर लावा आणि त्यावर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरवा.

त्यावर चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि भरपूर चीज घाला.

दुसऱ्या ब्रेड स्लाइसला पिझ्झा सॉस लावून पहिल्या स्लाइसवर ठेवा.

तवा गरम करून त्यावर थोडं बटर टाका आणि सँडविच दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

वरून आवडीनुसार थोडं चीज घालून गरमागरम सर्व्ह करा.

अशा प्रकारे अवघ्या काही मिनिटांत तयार होणारे हे पिझ्झा टोस्ट सँडविच नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकते.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video