लाईफस्टाईल

Poha Pakoda Recipe : कंटाळवाण्या पोह्यांना द्या टेस्टी ट्विस्ट - झटपट पोहा पकोडे रेसिपी

रोज रोज तेच तेच पोहे खाऊन आपण सगळेच कंटाळतो. म्हणून आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी या पोहयनपासून बनणारी झटपट रेसिपी- 'पोहे पकोडे'. सर्वात आधी पोहे नीट धुवून पाणी निथळून घ्या...

Mayuri Gawade

रोज रोज तेच तेच पोहे खाऊन आपण सगळेच कंटाळतो. म्हणून आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी या पोहयनपासून बनणारी झटपट रेसिपी- 'पोहे पकोडे'. हे अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही बनवू शकता. सकाळच्या धावपळीत किंवा संध्याकाळी दमून घरी आल्यानंतर ही असे झटपट बनणारे पदार्थ कोणत्याही लाइफसेव्हर पेक्षा कमी नाहीत. चला तर मग जाणून घेऊया ही झटपट बनणारी पोहा पकोडा रेसिपी...

साहित्य

  • १ कप पोहे

  • २ उकडलेले बटाटे

  • १ कांदा (बारीक चिरलेला)

  • १ कप बेसन

  • २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)

  • चाट मसाला (चवीनुसार)

  • मीठ (चवीनुसार)

  • भाजलेले शेंगदाणे

  • तेल (तळण्यासाठी)

कृती :

सर्वात आधी पोहे नीट धुवून पाणी निथळून घ्या. उकडलेले बटाटे मॅश करून त्यात धुतलेले पोहे मिसळा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा. हळूहळू बेसन घालून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा. गॅसवर पॅन गरम करा, त्यात तेल टाका आणि मिश्रणाचे लहान गोल पकोडे करून तेलात हळूहळू तळा. आच मंद ठेवा जेणेकरून पकोडे आतून शिजून बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होतील. सोनेरी तपकिरी झाले की पकोडे तेलातून काढा आणि गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके