(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

Valentine's Week : प्रेम व्यक्त करण्याचा योग्य दिवस! होकार मिळवायचा असेल तर Propose Dayला करा 'या' टिप्स फॉलो

अनेक जण वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवलेले प्रेम याच दिवशी व्यक्त करतात. मात्र, प्रेम व्यक्त करताना केवळ भावना पुरेशा नसतात, तर...

किशोरी घायवट-उबाळे

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला की प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य क्षण शोधणाऱ्यांची धावपळ सुरू होते. या आठवड्यातील दुसरा दिवस म्हणजेच 'प्रपोज डे'.आपल्या भावना शब्दात मांडण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. अनेक जण वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवलेले प्रेम याच दिवशी व्यक्त करतात. मात्र, प्रेम व्यक्त करताना केवळ भावना पुरेशा नसतात, तर योग्य वेळ, योग्य पद्धत आणि थोडी तयारीही तितकीच महत्त्वाची असते. खास व्यक्तीला जीवनसाथी बनवायचे असेल, तर ‘प्रपोज डे’ला या टिप्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

योग्य वेळ आणि जागेची निवड करा

प्रपोज करताना शांत, अर्थपूर्ण आणि दोघांसाठी खास असलेली जागा निवडा. पहिली भेट, आवडते कॅफे किंवा निसर्गाच्या सान्निध्यातील ठिकाण हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

मनापासून बोला, नाटक टाळा

मोठ्या तयारीपेक्षा मनापासून बोललेले दोन शब्द अधिक परिणामकारक ठरतात. खोटा दिखावा न करता आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा.

छोटंसं सरप्राइज द्या

फूल, हस्तलिखित पत्र, फोटो फ्रेम किंवा छोटंसं गिफ्ट द्या. सरप्राइज मोठं असायलाच हवं असं नाही, पण ते अर्थपूर्ण असावं.

समोरच्याच्या भावना समजून घ्या

प्रपोज करण्याआधी समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या तयार आहे का, याचा अंदाज घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीवर दबाव टाकणं टाळा.

उत्तरासाठी वेळ द्या

‘हो’ किंवा ‘नाही’ लगेचच उत्तर मिळायला हवं असा आग्रह धरू नका. समोरच्याला विचार करण्यासाठी वेळ द्या.

सोशल मीडियाचा अतिरेक टाळा

हा खास क्षण असतो, पण तो खाजगी ठेवणं अनेकदा अधिक योग्य ठरतं. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणं टाळा.

‘प्रपोज डे’ हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून, नात्याची नवी सुरुवात करण्याची संधी आहे. योग्य पद्धतीने आणि समजूतदारपणे केलेला प्रस्ताव नात्याला अधिक घट्ट बनवू शकतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग