(Photo-@JKGourmet)
लाईफस्टाईल

Ramadan 2026 : इफ्तारसाठी गोड ट्विस्ट! घरीच बनवा केसर पिस्ता बासुंदी; वाचा साहित्य आणि टिप्स

दिवसभर उपवास केल्यानंतर शरीराला ऊर्जा देणारे आणि मनाला समाधान देणारे डेझर्ट खाण्याची परंपरा आहे. अशातच केसर पिस्ता बासुंदी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

किशोरी घायवट-उबाळे

रमजान महिन्यात इफ्तारच्या वेळी गोड आणि पौष्टिक पदार्थांना विशेष महत्त्व असते. दिवसभर उपवास केल्यानंतर शरीराला ऊर्जा देणारे आणि मनाला समाधान देणारे डेझर्ट खाण्याची परंपरा आहे. अशातच केसर पिस्ता बासुंदी हा एक उत्तम पर्याय ठरतो. दुधाची गोड चव, केशराचा सुगंध आणि पिस्त्यांचा कुरकुरीतपणा यामुळे हा पदार्थ खास बनतो.

साहित्य :

  • फुल फॅट दूध - १ लिटर

  • केशर - छोटा अर्धा चमचा किंवा आवडीनुसार

  • चिरलेले पिस्ते - १/२ कप

  • साखर - १/२ कप

  • वेलची पूड - १/२ टीस्पून

  • पिस्त्याचे काप - सजावटीसाठी

कृती :

कढईत दूध गरम करून त्यात केशर घाला आणि मंद आचेवर १५ ते २० मिनिटे आटवा. दूध ३/४ इतके घट्ट झाल्यावर त्यात पिस्ते, साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजवा आणि नंतर मिश्रण थंड होऊ द्या. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून वरून केशर आणि पिस्त्याचे काप घालून सजवा. थंड किंवा कोमट अशा दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता.

महत्त्वाच्या टिप्स :

  • बासुंदी अधिक स्वादिष्ट करण्यासाठी दूध मंद आचेवरच आटवा.

  • केशर आधी थोड्या गरम दुधात भिजवून घातल्यास रंग आणि चव अधिक छान येते.

  • साखरेऐवजी गूळ वापरल्यास हेल्दी पर्याय मिळतो.

  • इफ्तारसाठी थंड करून सर्व्ह केल्यास चव दुप्पट होते.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी