हिरवी मिरची 'अशी' चिरा; पदार्थाची चवच बदलेल, वाचा शेफ रणवीर ब्रार यांची खास टिप 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Kitchen Tips : हिरवी मिरची 'अशी' चिरा; पदार्थाची चवच बदलेल, वाचा शेफ रणवीर ब्रार यांची खास टिप

हिरवी मिरची योग्य पद्धतीने चिरल्यास तिचा सुगंध, तिखटपणा आणि फ्लेवर पदार्थात अधिक संतुलितपणे मिसळतो.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय स्वयंपाकात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास दररोज केला जातो. मात्र, बहुतेक जण प्रत्येक पदार्थासाठी मिरची एकाच पद्धतीने चिरतात. प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या मते, ही छोटीशी सवयही पदार्थाची चव आणि फ्लेवर बदलू शकते. त्यांनी सोशल मीडियावर हिरवी मिरची चिरण्याची योग्य पद्धत सांगितली असून, त्यांची ही सोपी टिप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रत्येक मिरचीचा आकार वेगळा

रणवीर ब्रार सांगतात की, सर्व हिरव्या मिरच्या एकसारख्या नसतात. त्यामुळे सर्वप्रथम मिरचीच्या खालच्या बाजूचा छोटासा भाग कापून तिचा आकार समान करावा. कापलेला तुकडा फेकून देण्याऐवजी तो पुन्हा पदार्थात वापरू शकता.

मिरचीच्या जाड बाजूला चिरा द्या

प्रत्येक मिरचीची एक बाजू जाड आणि गोलसर, तर दुसरी बाजू सपाट असते. मिरचीच्या जाड बाजूला उभी चीर द्यावी. त्यामुळे मिरचीतील तिखटपणा आणि फ्लेवर पदार्थात अधिक चांगल्या प्रकारे मिसळतो.

तिखटपणा हवा तसा ठरवा

काही जण मिरचीतील बिया काढून टाकतात, तर काही त्या तशाच ठेवतात. रणवीर ब्रार यांच्या मते, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार असावा. कमी तिखट पदार्थ हवा असेल तर बिया काढून टाका. मात्र, जास्त तिखट चव हवी असेल तर बिया तशाच ठेवा.

छोटा बदल, मोठा फरक

हिरवी मिरची योग्य पद्धतीने चिरल्यास तिचा सुगंध, तिखटपणा आणि फ्लेवर पदार्थात अधिक संतुलितपणे मिसळतो. त्यामुळे साधा पदार्थही अधिक चविष्ट होऊ शकतो. रणवीर ब्रार यांची ही सोपी किचन टिप स्वयंपाक करताना नक्कीच उपयोगी ठरू शकते.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता