दिवसातून किती वेळा चहा पिणं योग्य? चहाप्रेमींसाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरांचा सल्ला 
लाईफस्टाईल

दिवसातून किती वेळा चहा पिणं योग्य? चहाप्रेमींसाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरांचा सल्ला

चहा पिण्याच्या नादात अनेकजण जेवण टाळतात, पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. दिवेकरांच्या मते...

Mayuri Gawade

आपल्या सकाळच्या रूटीनची सुरुवात बहुतांश लोक चहानेच करतात. उठल्याबरोबर गरमागरम चहाचा कप हातात आला की दिवसाची सुरुवातच सुखद होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, दिवसातून किती वेळा चहा पिणं खरंच योग्य आहे? आणि चुकीच्या वेळी घेतलेला चहा शरीरावर कसा परिणाम करतो? याच प्रश्नाचं सोपं पण महत्त्वाचं उत्तर प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

दिवसात किती वेळा चहा घ्यावा?

ऋजुता दिवेकर यांच्या मते, जर तुम्ही संतुलित जीवनशैली पाळत असाल तर दिवसातून दोन ते तीन कपपेक्षा जास्त चहा घेऊ नये. चहाचे अधिक प्रमाण शरीरातील नैसर्गिक पोषक घटकांचे संतुलन बिघडवू शकते.

रिकाम्या पोटी चहा घेऊ नका

अनेक जण सकाळी उठताच चहा घेतात, पण ऋजुता दिवेकरांनी हे टाळण्याचा सल्ला दिला आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी काहीतरी हलकं खाऊन मगच चहा घ्यावा.

जेवण वगळून चहा? चूकच!

चहा पिण्याच्या नादात अनेकजण जेवण टाळतात, पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. दिवेकरांच्या मते, चहामुळे भूक दाबली जाते आणि त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.

दिवसाच्या शेवटी झोप न येणे हा अनेकांचा त्रास असतो. दिवेकरांच्या म्हणण्यानुसार, दुपारी ४ नंतर चहा किंवा कॉफी घेणं टाळलं पाहिजे, कारण यामुळे झोपेचं चक्र विस्कळीत होतं.

एक मजेशीर गोष्ट

ऋजुता दिवेकरांनी या मुलाखतीत हिमालयातील ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेची गोष्ट सांगितली. त्या महिलेने विनोदाने सांगितलं होतं की ती दिवसाला ५० कप चहा पिते, तरी तिला कधीच ॲसिडिटी होत नाही! त्यावर ऋजुता म्हणाल्या, "जर तुम्ही त्या बाईसारखे असाल, तर हवे तितके कप चहा घ्या!"

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात