प्रातिनिधिक छायाचित्र - You Tube - ItsJustKelli
लाईफस्टाईल

'हा' फॅशन ट्रेंड बनवेल तुमच्या नेहमीच्या ड्रेसला स्टायलिश

तुम्हाला तुमच्या नेहमीच्या किंवा एखाद्या जुन्या ड्रेसला स्टायलिश बनवायचे असेल तर मार्केटमध्ये मिळणारी एक छोटी वस्तू तुमची मदत करेल. सध्या फॅशन ट्रेंड्समध्ये Skinny Belt हा खूप लोकप्रिय ठरत आहे.

Kkhushi Niramish

तुम्हाला तुमच्या नेहमीच्या किंवा एखाद्या जुन्या ड्रेसला नवीन आणि स्टायलिश बनवायचे असेल तर मार्केटमध्ये मिळणारी एक छोटी वस्तू तुमची मदत करेल. सध्या फॅशन ट्रेंड्समध्ये Skinny Belt हा खूप लोकप्रिय ठरत आहे. या बेल्टमध्ये असंख्य व्हरायटीज आहे. Skinny Belt हा काही अगदीच नवीन प्रकार नाही. जुन्या काळात साडीवर कमरपट्टा लावण्याची पद्धत होती. त्याच प्रकारातील आहे हा Skinny Belt. हा एक बेल्ट तुमच्या कोणत्याही ड्रेसला स्टायलिश बनवू शकतो. त्यामुळेच हा बेल्ट वापरून ड्रेसला आकर्षक बनवण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे.

Skinny Belt हा अनेक रंग, डिजाईन आणि व्हरायटीजमध्ये मिळतो. याची किंमत लोकल मार्केटमध्ये ५० रुपयांपासून सुरू होते. तर काही उच्च गुणवत्ता असलेले बेल्ट हे १००० रुपयांपर्यंतही मिळतात. एक साधा वन पिस असला आणि तुम्ही त्यावर साजेसा असा एखादा Skinny Belt आवळला तर त्या ड्रेसची स्टाईल एकदम बदलून जाते आणि नव्यासारखा तसेच हटके वाटतो. किंबहुना तुम्ही घरच्या-घरी देखील तुम्ही जुन्या टाकाऊ कपड्यांमधून असा आकर्षक बेल्ट तयार करू शकता. हा बेल्ट लोकप्रिय ठरण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे हा बेल्ट अनेक वेगवेगळ्या स्टाईल करून तुम्ही वापरू शकता. कधी तुम्ही याची साखळी टाईप डिजाईन बनवू शकता. तर कधी तुम्ही गाठ बांधून त्याचं फूल बनवू शकता. इतकंच काय अगदीच डोक्याला लावायची रिबन सुद्धा आकर्षक पद्धतीने तुमच्या ड्रेसला बांधून त्याचाही Skinny Belt बनवू शकता.

कशावर वापरावा Skinny Belt

Skinny Belt हा वन पिस, लाँग शर्ट, कुर्ता, फ्रॉक, पंजाबी ड्रेस, साडी अशा जवळपास सर्वच प्रकारच्या ड्रेसवर हा Skinny Belt एकदम मस्त दिसतो. तुमचं फिगर कसही असलं तरी हा बेल्ट तुम्हाला वापरता येतो. तुमचे वजन जास्त असले तरी आणि तुम्ही अगदीच बारीक असाल तरी तुम्हाला हा बेल्ट सूट करू शकतो. एखाद्या सैलसर लाँग शर्टवर Skinny Belt लावला की तोच शर्ट वेगळा वाटतो आणि तुम्हाला नवीन लूक मिळतो. एखादी प्लेन साडी, किंवा पंजाबी ड्रेसची ओढणी यावर त्या साडी आणि ड्रेसप्रमाणे आकर्षक असणारा बेल्ट लावला की साडीचा पदर आणि ओढणीला तुम्ही फिट करू शकता. त्यामुळे नवा लूक तर मिळतोच मात्र काम करताना धावपळ करताना देखील साडी आणि पंजाबी ड्रेस फिट राहतात.

हातातील ब्रासलेट आणि कमरेला Skinny Belt देतो अॅट्रॅक्टिव लूक

एका फॉर्मल ड्रेसवर हातात एक आकर्षक ब्रासलेट आणि कमरेला त्याला साजेसा बेल्ट हे कॉम्बिनेशन देतो तुम्हाला एकदम अॅट्रॅक्टिव्ह लूक. तसेच यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व देखील खुलून दिसते.

जुन्या ड्रेसला मिळेल नवा लूक

तुमच्या रोजच्या वापरातील एखादा ड्रेस जुना झाला असेल आणि आता तो वापरू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. त्याला तुम्ही Skinny Belt ने एकदम स्टायलिश बनवू शकता. त्या ड्रेसवर मॅचिंग असा Skinny Belt घ्या हा बेल्ट त्या ड्रेसवर फिट करा. त्यासोबत कोणत्या हातात एक ब्रासलेट आणि मॅचिंग कानातले घातले की तुम्हाला तोच ड्रेस पुन्हा नवीन वाटायला लागेल, तर अशी आहे Skinny Belt ची जादू. तसेच हा स्किनी बेल्ट तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये अगदी सहजरित्या मिळू शकतो किंवा तुम्ही ऑनालइन देखील हा स्किनी बेल्ट वापरू शकता.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video