लाईफस्टाईल

क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे लिव्हर कॅन्सरने निधन; जाणून घ्या या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार

लिव्हर कॅन्सर हा यकृताशी संबंधित गंभीर आजार असून, विशेषतः स्टेज ४ हा त्याचा सर्वात गंभीर टप्पा मानला जातो. हा आजार नेमका काय आहे, तो कशामुळे होतो आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्या वडिलांचे स्टेज ४ लिव्हर कॅन्सरमुळे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर लिव्हर कॅन्सर हा किती धोकादायक आजार आहे, याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. लिव्हर कॅन्सर हा यकृताशी संबंधित गंभीर आजार असून, विशेषतः स्टेज ४ हा त्याचा सर्वात गंभीर टप्पा मानला जातो. हा आजार नेमका काय आहे, तो कशामुळे होतो आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

लिव्हर कॅन्सरच्या स्टेज ४ या टप्प्यात कॅन्सर पेशी यकृताबाहेर इतर अवयवांमध्येही पसरू शकतात, त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीच्या होतात. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेकदा या आजाराचे उशिरा निदान होते.

तज्ज्ञांच्या मते, लिव्हर कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. दीर्घकाळ मद्यपान, हिपॅटायटिस बी आणि सी संसर्ग, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा आणि असंतुलित आहार ही त्याची प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय, जंक फूडचे जास्त सेवन, धूम्रपान आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळेही लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होतो. सुरुवातीला भूक कमी होणे, वजन झपाट्याने घटणे, पोटात वेदना, त्वचा किंवा डोळे पिवळे होणे (कावीळ) अशी काही लक्षणे दिसू शकतात.

लिव्हर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. मद्यपान टाळणे किंवा मर्यादित ठेवणे, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे यामुळे लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हिपॅटायटिस बीचे लसीकरण आणि नियमित आरोग्य तपासणी करणेही महत्त्वाचे मानले जाते. कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लिव्हर हे शरीरातील महत्त्वाचे अवयव असल्याने त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यामुळे निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित तपासणी यांवर भर दिल्यास लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो.

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट