४. दररोज व्यायाम करणे शरीरासाठी व्यायाम गरजेचा असतो. व्यायामातून शरीराची फिटनेस उत्तम राहते, शिवाय दिवसभर उत्साह देखील कायम राहतो. त्यामुळे आनंद मिळेल अशा गोष्टी करा. जिम, मॉर्निंग वॉक, डान्स किंवा योगाद्वारे तुम्ही दररोज थोड्यावेळासाठी का होईना शरीराची हालचाल करा.  
लाईफस्टाईल

विकेंडला व्यायाम करूनही राहू शकता फिट !

Rutuja Karpe

आजकाल कामाच्या आणि पैशांच्या मागे धावताना जेवण, रिलॅक्सेशन, कुटुंबीयांबरोबर गप्पा, झोप आणि व्यायाम अशा आरोग्याला आवश्यक गोष्टींना आठवडाभरात वेळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे विकेंडला हॉटेलमध्ये पोटभर खाणे, कुठे तरी बाहेर फिरायला जाणे, सिनेमा पाहणे, पण या शनिवार-रविवारमध्ये व्यायामसुद्धा उरकला, तरी शरीराला तो नियमित व्यायामाइतका उपयुक्त ठरतो.

आठवडाभरात एकूण अडीच तास व्यायाम केला, तर वजन, रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतात. हृदयविकार, अर्धांगवायूसारखे प्राणघातक आजार होत नाहीत, त्यांचे रक्ताभिसरण तसेच श्वासोच्छ्वास उत्तम रीतीने होतात बैठ्या जीवनशैलीशी निगडित आजार होण्याची, अकाली मृत्यूची शक्यता दुरावते आणि तब्येत सुदृढ राहते.

आठवड्यातली ही व्यायामाची १५० मिनिटे विकेंडच्या दोन दिवसांत, प्रत्येकी ७५ मिनिटे खर्च करून भागवली, तरी त्याचा तितकाच चांगला उपयोग होतो असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. विकेंडला करायच्या व्यायामापासून आरोग्यदायी फायदा व्हायला हवा असेल, तर तो ७५ मिनिटांचा आणि अतिशय जोमदार व्यायाम असावा, सर्वसामान्य मध्यमवयीन स्त्री-पुरुषांनी सुरुवातीचे १२ आठवडे सौम्य असा व्यायाम रोज ३० मिनिटे करावा. हळूहळू त्यातील वेग आणि जोम वाढवावी. त्यानंतर आठवड्यातले फक्त दोन दिवस व्यायाम केला तरी चालेल.

इंग्लंडमधील लाफबरो विद्यापीठातील डॉ. गॅरी ओह्नडोनोवन या शास्त्रज्ञाने ४० वर्षांवरील ६४ हजार व्यक्ती आणि इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये वेगवेगळेआजार झालेल्या ११ विस्तृत स्वरूपातल्या सर्वेक्षणांचा यासाठी अभ्यास केला, यामध्ये तीन गट होते.

दररोज नियमितपणे व्यायाम करणारे, फिटनेस फ्रिक्स दुसरा फक्त विकेंडलाच घाम गाळणारे, विकेंड वॉरिअर्स आणि तिसरे शरीराला बिल्कूल कष्ट न देणारे म्हणजेच अजिबातच व्यायाम न करणारे. या तिन्ही गटांचा १९९४ ते २००८ या १५ वर्षांत केलेल्या संशोधनातून असे निष्कर्ष निघाले :-

■ जे अजिबात व्यायाम करत नाहीत त्याना मधुमेह, अर्धागवायू, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग असे दीर्घकाळ टिकणारे आजार होतात, ते अशा आजारांनी कमी वयात मृत्युमुखीही पडू शकतात.

■ जे थोडा का होईना, पण रोजच्या रोज न चुकता, नियमितपणे व्यायाम करतात किंवा आठवडयातले दोनच दिवस का होईना, पण नियमितपणे व्यायाम करत राहतात, त्यांच्यामध्ये अकाली मृत्युमुखी पडण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.

■ म्हणजेच व्यायाम रोज करा किंवा आठवड्यातले दोनच दिवस करा, आरोग्य चांगले ठेवायला आणि दीर्घायुषी व्हायला दोन्ही तितकेच उपयुक्त आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस