छायाचित्र सौ. - Freepik
लाईफस्टाईल

Sunburn Skin : झिरो बजेटमध्ये करा सनबर्न त्वचेचा कायापालट; चेहरा पाहून सेल्फीचा मोह आवरणार नाही

तुम्हालाही उन्हाचा असा त्रास होत असेल तर काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी झिरो बजेटमध्ये फेसपॅक तयार करून यावर उपाय करू शकता.

Kkhushi Niramish

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. या काळात अल्पावधीसाठी सुद्धा बाहेर पडल्याने त्वचा काळवंडते. तसेच त्वचेचा दाह होतो. याला सनबर्न म्हणतात. या पासून बचावाचा सर्वोत्तम उपाय कडक उन्हात कमीत कमी वेळा बाहेर पडणे. बाहेर पडताना तोंडाला स्कार्फ बांधणे, सनकोटचा अधिकाधिक वापर करणे. मात्र, हे उपाय करूनही अनेक वेळा संवेदनशील त्वचेला लगेच त्रास होतो. तुम्हालाही उन्हाचा असा त्रास होत असेल तर काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी झिरो बजेटमध्ये फेसपॅक तयार करून यावर उपाय करू शकता.

सनबर्नवर करा कोरफडचा उपाय (Sunburn Skin)

कोरफड हे त्वचा आणि केसांसाठी निसर्गाने बहाल केलेले मोठे वरदान आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही कोरफडचा उपयोग चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वर्षाचे १२ महिने करू शकता. त्यामुळेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये जेल बनवण्यासाठी याचा मोठा उपयोग केला जातो. तसेच कोरफड ही घरात कुंड्यांमध्ये छोट्याशा जागेतही वाढवता येऊ शकते. त्यामुळे घरी कोरफड लावल्यास याचा फेस पॅक करताना कोणताही खर्च होत नाही. तुमच्याकडे जर घरात कोरफड लावलेले नसेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात शेजाऱ्यांकडे ते तुम्हाला सहज मिळेल. त्यामुळे सनबर्न त्वचेवर कोरफडचा पॅक करून लावा.

कोरफोड देईल त्वचेला पोषण (Sunburn Skin)

उन्हामुळे दाह होणाऱ्या त्वचेवर कोरफडचा गर चोळल्याने त्वचेचा दाह कमी होतो. कोरफडचा गर चोळून पंधरा मिनिटांनी चेहरा धुतल्याने उन्हामुळे झालेले टॅन लगेच कमी होते.

असा बनवा विशेष फेसपॅक

साहित्य - कोरफडचा गर किंवा जेल, दही आणि काकडी

कृती

कोरफडच्या पानातून त्यातील गर काढून घ्या. एका वाटीत हा गर चमच्याने फेटा जेणेकरून हे जेल एकसारखे होईल. एक काकडी किसून घ्या. आता दोन चमचे दही घेऊन कोरफडचा गर आणि काकडीचा किस यामध्ये चांगला एकत्रिक करून घ्या. हा पॅक चेहरा, हात, पाय आणि मानेवर लावा. दहा ते १५ मिनिटांनी थंडा पाण्याने धुवून घ्या. निश्चितच फायदा मिळेल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी