Sunday Special Recipe : जेवणाची मजा होईल दुप्पट; बनवा मसालेदार प्रॉन टिक्का मसाला 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : जेवणाची मजा होईल दुप्पट; बनवा मसालेदार प्रॉन टिक्का मसाला

नान, पराठा किंवा गरमागरम भातासोबत हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी हॉटेलसारखा प्रॉन टिक्का मसाला तुम्हीही घरच्या घरी सहज तयार करू शकता.

किशोरी घायवट-उबाळे

सीफूड प्रेमींसाठी प्रॉन टिक्का मसाला हा एक परफेक्ट आणि चविष्ट पदार्थ आहे. मसाल्यात मुरवलेले रसाळ प्रॉन्स, टोमॅटो, दही, क्रीम आणि सुगंधी मसाल्यांच्या ग्रेव्हीत शिजवल्यामुळे या डिशला अप्रतिम चव येते. नान, पराठा किंवा गरमागरम भातासोबत हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी हॉटेलसारखा प्रॉन टिक्का मसाला तुम्हीही घरच्या घरी सहज तयार करू शकता.

साहित्य :

प्रॉन्स मॅरिनेट करण्यासाठी

  • २० ते २५ जम्बो प्रॉन्स (स्वच्छ करून शीर काढलेले)

  • अर्ध्या लिंबाचा रस

  • १ टीस्पून मीठ

  • १ टीस्पून लाल तिखट

  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट

ग्रेव्हीसाठी

  • २ बारीक चिरलेले कांदे

  • ३ टोमॅटो प्युरी

  • १/२ कप दही

  • १/४ कप फ्रेश क्रीम

  • १ टीस्पून जिरे

  • १ टीस्पून हळद

  • १ टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट

  • १ टीस्पून मीठ (चवीनुसार)

  • १ टेबलस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट

  • १ टेबलस्पून बटर

  • २ टेबलस्पून तेल

  • १ टीस्पून तंदुरी मसाला (ऐच्छिक)

कृती :

एका भांड्यात लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट आणि आलं-लसूण पेस्ट एकत्र करून त्यात प्रॉन्स घाला. सर्व मसाला व्यवस्थित लागेल असे हलवून १५ ते २० मिनिटे मुरत ठेवा. कढईत बटर गरम करून मुरवलेले प्रॉन्स ४ ते ५ मिनिटे शिजवा. प्रॉन्स शिजल्यानंतर ते वेगळे काढून ठेवा.

त्याच कढईत तेल गरम करून जिरे तडतडू द्या. त्यानंतर चिरलेला कांदा घालून गडद सोनेरी रंग येईपर्यंत परता. कांदा परतल्यानंतर आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल तिखट, हळद आणि मीठ घालून एक मिनिट परता.

आता टोमॅटोची प्युरी घालून ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात दही, फ्रेश क्रीम आणि गरम मसाला मिसळा. शिजवलेले प्रॉन्स ग्रेव्हीत घाला. इच्छेनुसार तंदुरी मसाला घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर शिजवा. गरमागरम प्रॉन टिक्का मसाला बटर नान, तंदुरी रोटी, जिरा राईस किंवा साध्या भातासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • प्रॉन्स जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा ते कडक होतात.

  • काश्मिरी लाल तिखट वापरल्यास ग्रेव्हीला आकर्षक लाल रंग येतो.

  • दही घालण्यापूर्वी गॅस मंद ठेवा, त्यामुळे दही फाटत नाही.

  • अधिक रिच चव हवी असल्यास शेवटी थोडे बटर आणि क्रीम घाला.

  • प्रॉन्स ताजे वापरल्यास पदार्थाची चव अधिक खुलते.

  • ग्रेव्ही अधिक स्मूथ हवी असल्यास टोमॅटोची प्युरी गाळून वापरा.

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू

कोसळधार! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद

पावसाच्या तडाख्याने जनजीवन ठप्प; गावे जलमय, रस्ते बंद, पर्यटनस्थळांवर बंदी