लाईफस्टाईल

Surya Grahan 2025: 'या' चार राशींसाठी सूर्यग्रहण घेऊन येणार अच्छे दिन! पाहा तुमच्या राशीसाठी कसे असणार?

हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. शनि अमावस्येला लागणारे हे सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) आंशिक (खंडग्रास) स्वरुपाचे असणार असून ज्योतिषशास्त्रानुसार 'या' चार राशीच्या लोकांना हे खूपच लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या...

Kkhushi Niramish

सूर्यग्रहण-चंद्रग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे शुभ-अशुभ परिणाम होत असतात. काही राशीतील लोकांना हा ग्रहणकाळ मालामाल करून जातो. तर काहींसाठी सामान्य तर काहींना कंगालही करतो. वेगवेगळ्या राशीतील लोकांसाठी याचे परिणाम वेगवेगळे असतात. शनिवारी (दि 29) सूर्यग्रहण लागणार आहे. हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. शनि अमावस्येला लागणारे हे सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) आंशिक (खंडग्रास) स्वरुपाचे असणार असून ज्योतिषशास्त्रानुसार 'या' चार राशीच्या लोकांना हे खूपच लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या...

कुंभ राशी - अनपेक्षित लाभ संभवतो

29 मार्चचे आंशिक सूर्यग्रहण कुंभ राशीच्या लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. हे सूर्यग्रहण त्यांच्या कुंडलीत दुसऱ्या घरात असणार आहे. त्यांना अनपेक्षित स्रोताकडून फायदा होऊ शकतो. सोबतच गुंतवणूक करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मालमत्ता घेण्याची तुमची योजना यशस्वी ठरू शकतो. तसेच मालमत्तेसंबंधीच्या वादात तुमची सरशी होऊ शकते.

राजकीय क्षेत्रात मकर राशीच्या लोकांचे वर्चस्व

हे सूर्यग्रहण मकर राशीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना लाभ मिळवून देईल. तुमचे वर्चस्व आणि रुतबा वाढू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. सोबतच शनीच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना साडेसातीपासूनही आराम मिळेल.

मिथून- जुन्या ओळखीमुळे फायदा

मिथून राशीच्या लोकांच्या दहाव्या घरात सूर्यग्रहण होणार आहे. मिथून राशींच्या लोकांसाठी हे शुभ राहणार आहे. जुन्या ओळखीच्या लोकांकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. भूतकाळात केलेल्या प्रयत्नांचे आणि गुंतवणुकीचे फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. करिअरमध्ये चढ-उतार येतील, परंतु कठोर परिश्रमाने तुम्ही यशस्वी व्हाल. तांत्रिक क्षमता आणि व्यवस्थापनाचा तुम्हाला फायदा होईल.

शेअर बाजारातील गुंतवणूक वृषभ राशीच्या लोकांना देईल लाभ

तुमची राशी वृषभ आहे आणि तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला सूर्यग्रहण काळात लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल