टेस्टी आणि हेल्दी 'कॉर्न पालक खिचडी'; पावसाळ्यात नक्की ट्राय करा ही झटपट रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

टेस्टी आणि हेल्दी 'कॉर्न पालक खिचडी'; पावसाळ्यात नक्की ट्राय करा ही झटपट रेसिपी

पालकातील पोषणमूल्ये, स्वीट कॉर्नची गोड चव आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

पावसाळ्यात गरमागरम, पौष्टिक आणि हलकंफुलकं काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेहमीच्या खिचडीला थोडा ट्विस्ट देत तुम्ही घरच्या घरी 'कॉर्न पालक खिचडी' बनवू शकता. पालकातील पोषणमूल्ये, स्वीट कॉर्नची गोड चव आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी कमी वेळात तयार होते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

साहित्य :

  • ४ कप पालक (चिरलेला)

  • १ कप बासमती तांदूळ

  • अर्धा कप मूगडाळ

  • २ कप स्वीट कॉर्न

  • हळद

  • मीठ

  • २½ टीस्पून आले-लसूण पेस्ट

  • १ कप बारीक चिरलेला कांदा

  • अर्धा कप चिरलेला टोमॅटो

  • तिखट

  • गरम मसाला

  • धणेपूड

  • दालचिनीचा तुकडा

  • १ लवंग

  • २ वेलदोडे

  • २ टेबलस्पून जिरेपूड

  • कढीपत्ता

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • तूप किंवा तेल

कृती :

सर्वप्रथम तांदूळ आणि मूगडाळ स्वच्छ धुवून ३० मिनिटे भिजत ठेवा. कुकरमध्ये तांदूळ, डाळ, हळद, मीठ, स्वीट कॉर्न आणि २ कप पाणी घालून तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. दुसरीकडे पालक मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून प्युरी तयार करा.

कढईत तूप किंवा तेल गरम करून आले-लसूण पेस्ट परता. त्यात कांदा आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता स्वीट कॉर्न, पालक प्युरी, तिखट, गरम मसाला आणि धणेपूड घालून मिश्रण चांगलं परता. तयार खिचडी या मिश्रणात घालून आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ मिसळा. ३ ते ४ मिनिटे शिजू द्या.

फोडणीसाठी छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंग, दालचिनी, वेलदोडे, कढीपत्ता, लसूण आणि हिरव्या मिरच्या परता. ही फोडणी गरमागरम खिचडीवर घाला आणि सर्व्ह करा.

टिप्स :

  • खिचडी अधिक क्रीमी हवी असल्यास थोडं तूप वरून घाला.

  • मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी ठेवा.

  • दह्यासोबत किंवा पापडासोबत ही खिचडी अधिक चविष्ट लागते.

  • पालकाची प्युरी जास्त वेळ शिजवू नका, त्यामुळे रंग आणि पोषणमूल्य टिकून राहतात.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी