लाईफस्टाईल

Winter Special Food : थंडी वाढली की तिळाचे लाडू खायलाच हवेत! जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

हिवाळ्याच्या दिवसांत गोड पदार्थ खाण्याचा आनंद काही औरच असतो. या काळात गरमागरम गाजराचा हलवा, मऊसर गुलाबजाम, रसगळे असे अनेक पदार्थ चवीला जितके अप्रतिम असतात, तितकाच त्यांचा हंगामी ‘फॅन following’ही प्रचंड असतो. थंडी वाढली की घराघरांत गोड पदार्थांचा सुगंध दरवळायला लागतो आणि स्वयंपाकघरात त्यांना एक खास मानाचे स्थान मिळते.

नेहा जाधव - तांबे

हिवाळ्याच्या दिवसांत गोड पदार्थ खाण्याचा आनंद काही औरच असतो. या काळात गरमागरम गाजराचा हलवा, मऊसर गुलाबजाम, रसगळे असे अनेक पदार्थ चवीला जितके अप्रतिम असतात, तितकाच त्यांचा हंगामी ‘फॅन following’ही प्रचंड असतो. थंडी वाढली की घराघरांत गोड पदार्थांचा सुगंध दरवळायला लागतो आणि स्वयंपाकघरात त्यांना एक खास मानाचे स्थान मिळते.

मात्र गोड पदार्थांचे हे आकर्षण जेवढे मनाला आनंद देणारे, तेवढेच शरीरासाठी हानिकारक ठरू शकते अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण हिवाळ्यात काही पदार्थ असे असतात, जे चवीसोबत शरीरालाही अपार फायदे देतात. त्यापैकी सर्वात लोकप्रिय आणि पौष्टिक पर्याय म्हणजे तिळाचे लाडू.

हिवाळ्यात तिळाचे लाडू का खाल्ले जातात?

हिवाळा सुरू झाला की बाजारपेठांपासून घराघरांपर्यंत तिळाचे लाडू बनवण्याची लगबग सुरू होते. तिळातील उष्णता, गूळाची ताकद आणि साजूक तुपाचा सुगंध या तिन्हींचा संगम शरीराला थंडीपासून नैसर्गिक संरक्षण देतो.

तिळाचे लाडू हिवाळ्यात खास का?

  • उष्णता देणारे अन्न – तिळामध्ये नैसर्गिक उष्णता असते, ज्यामुळे थंड हवेत शरीराचे तापमान संतुलित राहते.

  • गूळातील आयर्न व मिनरल्स – रक्तशुद्धी, हिमोग्लोबिन वाढवणे आणि पचन सुधारण्यास मदत.

  • हाडांसाठी उत्तम – तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक मुबलक प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होतात.

  • ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत – थंडीत आळशीपणा वाढतो, अशावेळी तिळ–गूळाचे लाडू तात्काळ ऊर्जा देतात.

तिळाचे लाडू आरोग्याला कसे फायदेशीर?

तिळाचे लाडू दिसायला छोटे असले तरी त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.
तिळातील ‘हेल्दी फॅट्स’ आणि antioxidants शरीरात चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात तसेच त्वचा मऊ व तजेलदार ठेवतात.

महत्त्वाचे फायदे :

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे

  • त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर

  • सुज, वेदना आणि सांधेदुखी कमी करणे

  • केस व नखांची मजबुती

  • हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

किती प्रमाणात खावे?

कितीही पदार्थ आरोग्यासाठी चांगला असला तरी प्रमाण महत्त्वाचे. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात रोज १ ते २ तिळाचे लाडू पुरेसे असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

गोड खाणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय

आरोग्याला धोकादायक असलेल्या साखरेच्या मिठाईंपेक्षा तिळाचे लाडू हा अधिक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय आहे. म्हणूनच हिवाळा आला की घराघरांत तिळ–गूळाचा सुगंध पसरतो आणि या पारंपरिक भारतीय मिठाईची चव पुन्हा एकदा लहानपणाच्या आठवणी जागवते.

हिवाळ्यात ‘गोड खावंसं वाटतं’ हे नैसर्गिक आहे– पण योग्य गोड पदार्थांची निवड केली, तर चव आणि आरोग्य दोन्ही सांभाळता येतात. तिळाचे लाडू हे त्याचे उत्तम उदाहरण!

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब