प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, कार्यालये तसेच घरांमध्येही या दिवसाचे औचित्य साधून विशेष पदार्थ बनवले जातात. अशा वेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आणि देशभक्तीची भावना जागवणारा तिरंगा कपकेक हा खास गोड पदार्थ ठरतो.
साहित्य
मैदा - १ कप
साखर - अर्धा कप
बटर - अर्धा कप
दूध - अर्धा कप
बेकिंग पावडर - १ टीस्पून
व्हॅनिला एसन्स - अर्धा टीस्पून
केशरी व हिरवा फूड कलर
क्रीम (डेकोरेशनसाठी)
कृती
प्रथम एका भांड्यात बटर आणि साखर एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. त्यात दूध आणि व्हॅनिला एसन्स घालून नीट मिसळा. आता मैदा आणि बेकिंग पावडर चाळून हे मिश्रणात घाला. तयार मिश्रण तीन समान भागांत विभागा. एका भागात केशरी रंग, दुसरा पांढराच ठेवा आणि तिसऱ्या भागात हिरवा रंग मिसळा.
आता कपकेक मोल्डमध्ये सर्वात आधी केशरी, त्यावर पांढरा आणि शेवटी हिरवा थर घाला. ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर २०–२५ मिनिटे बेक करा. कपकेक थंड झाल्यावर वरून क्रीमने सजवा.
टिप
या कपकेकवर छोटासा तिरंगा, अशोकचक्र किंवा “Happy Republic Day” असा मेसेज लिहिल्यास ते अधिक आकर्षक दिसतील. २६ जानेवारीच्या निमित्ताने घरच्या घरी बनवलेले हे तिरंगा कपकेक केवळ गोड चवच नाही, तर देशप्रेमाची भावना देखील व्यक्त करतील.