UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं

PF च्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. UMANG ॲपवर घरबसल्या PF पासबुक, क्लेम, UAN, पेन्शनसह १० महत्त्वाच्या सेवा मिळतात. जाणून घ्या सविस्तर.

Mayuri Gawade

नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF ही भविष्यासाठीची महत्त्वाची बचत आहे. पण PF खात्यात किती पैसे जमा झाले, क्लेम कुठपर्यंत आला किंवा UAN अ‍ॅक्टिव्ह कसा करायचा, अशा छोट्या-मोठ्या कामांसाठी अनेकांना EPFO कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. आता यातील अनेक कामं मोबाईलवरूनच करता येतात. केंद्र सरकारच्या UMANG अ‍ॅपवर PF, UAN आणि पेन्शनशी संबंधित अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे PF खातेदारांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतात.

१. PF पासबुक पाहा

तुमच्या PF खात्यात दर महिन्याला किती रक्कम जमा झाली, नियोक्त्याने योगदान भरले आहे की नाही आणि खात्यात कोणते व्यवहार झाले आहेत, हे UMANG अ‍ॅपवर PF पासबुकमधून पाहता येते.

२. PF क्लेम करता येतो

पैशांची गरज असल्यास पात्रतेनुसार PF काढण्यासाठी ऑनलाइन क्लेमही UMANG अ‍ॅपवरून करता येतो. त्यासाठी प्रत्येक वेळी EPFO कार्यालयात जाण्याची गरज नाही.

३. क्लेम कुठपर्यंत आला ते तपासा

PF काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर पैसे कधी मिळणार, क्लेमची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, याचा स्टेटसही अ‍ॅपवर पाहता येतो.

४. UAN अ‍ॅक्टिव्ह करा

तुमचा Universal Account Number म्हणजेच UAN अ‍ॅक्टिव्ह नसेल, तर UMANGच्या माध्यमातून तो अ‍ॅक्टिव्ह करता येतो. यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध आहे.

५. नवीन UAN तयार करता येतो

UAN नसलेल्या कर्मचाऱ्यांना आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने UMANGवरून स्वतःचा UAN जनरेट करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

६. UAN आणि PF खात्याची माहिती

UAN आणि त्याच्याशी जोडलेल्या PF खात्यासंबंधी आवश्यक माहिती UMANGवरील EPFO सदस्य सेवांमधून मिळवता येते.

७. पेन्शन पासबुक पाहता येते

UMANGवर PFसोबत पेन्शनशी संबंधित सुविधाही उपलब्ध आहेत. पेन्शनधारकांना आपल्या पेन्शन खात्याची माहिती आणि पासबुक पाहता येते.

८. घरबसल्या जीवन प्रमाणपत्र

पेन्शनधारकांना जीवन प्रमाण म्हणजेच डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठीही UMANGचा उपयोग करता येतो. त्यामुळे या प्रक्रियेसाठी कार्यालयात जाण्याची गरज कमी होते.

९. EPFO कार्यालयाची माहिती शोधा

जवळचे EPFO कार्यालय किंवा संबंधित आस्थापनाची आवश्यक माहिती शोधण्यासाठीही UMANGवरील सेवा उपयोगी ठरतात.

१०. मोबाईलवर मिळवा PFची माहिती

PF खात्याशी संबंधित काही माहिती मोबाईलवरूनही मिळवता येते. EPFOकडून SMS आणि मिस्ड कॉलसारख्या सुविधांद्वारेही खात्याची माहिती मिळवण्याची सोय उपलब्ध आहे.

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा

UMANGमुळे PFची अनेक कामं घरबसल्या सोपी झाली असली, तरी UAN, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती किंवा OTP कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. EPFOच्या नावाने येणारे संशयास्पद फोन आणि मेसेजपासूनही सावध राहा.

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक