लाईफस्टाईल

Valentine’s Week : नातं अधिक घट्ट करणारा Hug Day; मिठी मारल्याने नक्की काय होतं?

मिठी ही केवळ प्रेमाची खूण नसून ती काळजी, आधार आणि नात्यांतील जवळीक दाखवण्याचा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे.

किशोरी घायवट-उबाळे

व्हॅलेंटाईन वीकमधील एक खास दिवस म्हणजे हग डे(Hug Day). प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधार व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मिठी ही केवळ प्रेमाची खूण नसून ती काळजी, आधार आणि नात्यांतील जवळीक दाखवण्याचा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवस आधी म्हणजेच १२ फेब्रुवारीला येणारा हा दिवस प्रेमी युगुलांसोबतच मित्र-मैत्रीण आणि कुटुंबीयांमध्येही उत्साहात साजरा केला जातो.

'हग डे'ची सुरुवात कशी झाली?

हग डेची सुरुवात १९८६ साली अमेरिकेतील मिशिगन येथे केविन झाबोर्नी यांनी केली. लोक सार्वजनिक ठिकाणी आपुलकी व्यक्त करताना संकोच करतात, हे त्यांच्या लक्षात आले. हा संकोच दूर व्हावा आणि लोकांनी मोकळेपणाने प्रेम व मैत्री व्यक्त करावी, या उद्देशाने त्यांनी हा दिवस सुरू केला.

'हग डे'चे महत्त्व

मिठी मारण्यासाठी शब्दांची गरज नसते. ती कोणत्याही अपेक्षेशिवाय दिलेला आधार असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण छोट्या गोष्टींचे महत्त्व विसरतो. पण एक साधी मिठीही एखाद्याचा दिवस आनंदी करू शकते, कठीण काळात मानसिक आधार देऊ शकते आणि नाती अधिक मजबूत करू शकते. मिठी आपल्याला आठवण करून देते की आपण एकटे नाही, तर कुणीतरी आपल्यासोबत आहे.

मिठीचे फायदे

वैज्ञानिकदृष्टीने, मिठीचे अनेक फायदे आहेत. संशोधक आणि इम्युनोलॉजिस्ट डॉ. लीना वेलिकोव्हा यांच्या मते, मिठी मारल्यावर शरीरात ऑक्सिटोसिन या 'बॉन्डिंग हार्मोन'चे स्रवण होते. हा हार्मोन भावनिक नातेसंबंध मजबूत करतो आणि आनंदाची भावना वाढवतो.

त्याचवेळी मिठीमुळे कॉर्टिसोल (Cortisol) या ताणाशी संबंधित हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे ताण कमी होतो, मन शांत राहते आणि हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. नियमित मिठी मारल्याने झोप सुधारते आणि तणावाचा सामना करण्याची क्षमता वाढते.

कसा साजरा कराल 'हग डे'?

हग डे साजरा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला एक प्रेमळ मिठी देणे. मात्र, समोरच्या व्यक्तीची परवानगी आणि सोयीचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक साधी मिठी नात्यांमध्ये उब आणि विश्वास निर्माण करू शकते, हाच 'हग डे' चा मुख्य हेतू आहे.

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना