Summer Drink : फ्रोजन वॉटरमेलन कूलर; उन्हाळ्यात देईल इंस्टंट थंडावा, वाचा रेसिपी  
लाईफस्टाईल

Summer Drink : फ्रोजन वॉटरमेलन कूलर; उन्हाळ्यात देईल इंस्टंट थंडावा, वाचा रेसिपी

कलिंगड, पुदिना, लिंबू आणि सोडा यांचा ताजेतवाना संगम असलेले हे पेय केवळ चविष्टच नाही, तर उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठीही उत्तम पर्याय ठरू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा वाढला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची गरज अधिक जाणवते. अशा वेळी घरच्या घरी पटकन तयार होणारे, चविष्ट आणि रिफ्रेशिंग पेय मिळाले तर मजाच काही और! सध्या सोशल मीडियावर एक खास वॉटरमेलन ड्रिंक ट्रेंडमध्ये आहे. कलिंगड, पुदिना, लिंबू आणि सोडा यांचा ताजेतवाना संगम असलेले हे पेय केवळ चविष्टच नाही, तर उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठीही उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य :

  • २ कप फ्रोजन कलिंगडाचे तुकडे

  • ४ ते ५ बर्फाचे तुकडे

  • ८ ते १० पुदिन्याची पाने

  • १ ते २ टीस्पून लिंबाचा रस

  • आवश्यकतेनुसार सोडा

कृती :

सर्वप्रथम कलिंगडाचे तुकडे कापून काही वेळ फ्रीझरमध्ये ठेवून (बर्फासारखे कडक) फ्रोजन करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात फ्रोजन कलिंगड, बर्फाचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस घालून एकत्र ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण ग्लासमध्ये ओता आणि वरून आवश्यकतेनुसार थंड सोडा घाला. चमच्याने हलकेच ढवळा आणि वरून काही पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा. तयार आहे तुमचा थंडगार फ्रोजन वॉटरमेलन कूलर!

टिप्स :

  • अधिक गोड चव हवी असल्यास थोडे मध किंवा साखर घालू शकता.

  • सोड्याऐवजी स्पार्कलिंग वॉटर वापरल्यास पेय अधिक चांगले लागते.

  • कलिंगडा आधीच गार केल्यास बर्फ कमी लागतो.

  • पुदिन्याची पाने हाताने हलकी चुरून घातल्यास फ्लेवर अधिक छान येतो.

  • पार्टीसाठी सर्व्ह करताना ग्लासच्या कडेला लिंबाचा स्लाइस लावल्यास प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते.

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता