लाईफस्टाईल

'या' चूर्णात लपलंय वजन कमी करण्याचं रहस्य; आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात...

आजच्या धावपळीच्या आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढणं ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग, जिम, सप्लिमेंट्स यांचा आधार घेतात. मात्र, काही आयुर्वेदिक उपाय हे सहज, घरगुती आणि शरीरावर साइड इफेक्ट न करता उपयोगी ठरतात.

नेहा जाधव - तांबे

आजच्या धावपळीच्या आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढणं ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग, जिम, सप्लिमेंट्स यांचा आधार घेतात. मात्र, काही आयुर्वेदिक उपाय हे सहज, घरगुती आणि शरीरावर साइड इफेक्ट न करता उपयोगी ठरतात.

असाच एक प्रभावी उपाय आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितला आहे. त्यांनी एक खास आयुर्वेदिक चूर्ण (पावडर) तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे, जे नियमितपणे १५ दिवस घेतल्यास वजनात फरक दिसून येईल, असा त्यांचा दावा आहे.

चूर्ण तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू -

  • ओवा

  • बडीशेप

  • जिरे

  • मेथी

बनवण्याची पद्धत -

या चारही गोष्टी समान प्रमाणात घ्या. मध्यम आचेवर थोडं भाजा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करा आणि हवाबंद डब्यात स्टोअर करा.

कसा वापराल हे चूर्ण?

दररोज १ चमचा चूर्ण एक ग्लास गरम पाण्यात टाकून घ्या. हवं असल्यास स्वादासाठी थोडं काळं मीठ किंवा लिंबू रस टाकू शकता.

चूर्णातील घटकांचे फायदे -

ओवा - थायमोल नावाचं तत्व मेटाबॉलिझम वाढवतं आणि फॅट बर्निंगमध्ये मदत करतं. ब्लोटिंग आणि अ‍ॅसिडिटीही कमी होते.

बडीशेप - फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे भूक कमी लागते व शरीर डिटॉक्स होतं.

जिरे - मेटाबॉलिझम सुधारतो, कॅलरी बर्निंग वेगाने होते.

मेथी - सॉल्युबल फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, पोटावरील चरबी कमी होते.

काही महत्त्वाच्या सूचना -

प्रेग्नेंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे चूर्ण घेऊ नये. डायबिटीस किंवा बीपीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये. दिवसातून एकदाच एक चमचा चूर्ण घेणं पुरेसं आहे. जास्त घेणं टाळा.

वजन कमी करणं हे अनेकांसाठी मोठं आव्हान असलं तरी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि अशा नैसर्गिक उपायांचा उपयोग केल्यास त्यावर मात करता येऊ शकते. डॉ. जैदी यांचं हे चूर्ण तुम्हालाही उपयोगी ठरू शकतं, पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापर करावा.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल