wildpixel
लाईफस्टाईल

World Multiple Sclerosis Day 2024: मल्टीपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं

Symptoms of Multiple Sclerosis: जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिवस दरवर्षी ३० मे रोजी साजरा केला जातो. हा आजार नक्की काय असतो आणि याची लक्षणं काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

Tejashree Gaikwad

World Multiple Sclerosis (MS) Awareness Day 2024: मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराबद्दल अनेक लोकांना अजूनही माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत. याच कारणाने जागतिक मल्टीपल स्क्लेरोसिस दिवस दरवर्षी मल्टिपल स्क्लेरोसिसच्या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बऱ्याच लोकांना या आजाराची माहिती नसते आणि जेव्हा त्यांना मल्टीपल स्क्लेरोसिसचे निदान होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. हा एक क्रॉनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेवर, विशेषतः मेंदू आणि पाठीचा कणा प्रभावित करतो. मल्टिपल स्क्लेरोसिस इंटरनॅशनल फेडरेशनच्या मते, मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराने जगभरात २.३ दशलक्षाहून अधिक व्यक्तींना प्रभावित केले आहे. या लेखातून मल्टिपल स्क्लेरोसिस रोगाची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया.

हा आजार नक्की काय आहे?

मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींवर हल्ला करतो. मायलिनमध्ये असलेल्या निरोगी पेशी या रोगामुळे प्रभावित होतात. यामुळे मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांशी नीट संवाद साधता येत नाही. यामुळे अंतर्गत अवयवांचे नुकसान होते. मेंदू आणि पाठीचा कणा हा आजार निकामी करतो. हळूहळू या आजारामुळे मेंदूवरील नसांचे नुकसान होऊन विपरीत परिणाम घडू शकतात.

काय आहेत लक्षणं?

> अत्यंत थकवा येणे

> सामान्यपणे चालण्यात-फिरण्यात समस्या येणे

> संभाषणात समस्या येणे

> मान हलवताना धक्का जाणवणे

> चिडचिड आणि मूड बदलणे

> शरीराच्या काही भागात सुन्नपणा किंवा वेदना जाणवणे

> डोळ्याची उघडझाप करताना वेदना होणे.

धूम्रपान आणि मद्यपान करू नका

हे लक्षात घ्या धूम्रपान आणि मद्यपान केल्याने मल्टिपल स्क्लेरोसिसची लक्षणे वाढू शकतात. त्याचप्रमाणे, रोगाशी संबंधित गुंतागुंत आणखी गंभीर होऊ शकतात. यासोबतच तुमच्या लाईफस्टाईल शक्य तितकी निरोगी बनवा. झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ फिक्स करा आणि तणावाचे व्यवस्थापन करा. यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिसचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत