You Tube @ ज्ञान मराठी
लाईफस्टाईल

दही आणि योगर्टमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या, आरोग्यासाठी काय उत्तम?

उन्हाळा सुरू आहे अशा कडक उन्हाळ्यात आपल्याला दही खावेसे वाटते. अनेकांना दह्याला इंग्रजीत योगर्ट म्हणतात, असे वाटते. मात्र, ते तसे नाहीये. दही आणि योगर्ट दोन्हींमध्ये काही फरक आहे. बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल दोघांच्या टेक्सचरमध्ये फरक आहे. चला तर जाणून घेऊ या दही आणि योगर्टमध्ये नेमका काय फरक आहे?

Kkhushi Niramish

उन्हाळा सुरू आहे अशा कडक उन्हाळ्यात आपल्याला दही खावेसे वाटते. अनेकांना दह्याला इंग्रजीत योगर्ट म्हणतात, असे वाटते. मात्र, ते तसे नाहीये. दही आणि योगर्ट दोन्हींमध्ये काही फरक आहे. बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल दोघांच्या टेक्सचरमध्ये फरक आहे. चला तर जाणून घेऊ या दही आणि योगर्टमध्ये नेमका काय फरक आहे?

दही आणि योगर्ट

दही आणि योगर्ट या दोन्हींमध्ये फार जास्त फरक नसतो. दोन्हीही दुधापासून किण्वन केलेल्या प्रक्रियेद्वारे बनवले जाते. मात्र, किण्वन प्रक्रियेत जे जीवाणू असतात. त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे असतात. तसेच त्यांचे गुणधर्म पौष्टिक तत्वे आणि फायदे याच्यात थोडा फार फरक असतो. यामुळे दोघांमध्ये स्वाद आणि आम्लता वेगवेगळी असते.

दही आणि योगर्ट बनवण्याची कृती

दुधापासून दही बनवताना दूध प्रथम चांगले उकळून घेतात. नंतर ते ३५ ते ४० अंश सेल्सियस तापमानापर्यंत आले असताना म्हणजेच कोमट असताना एका भांड्याला किण्वन लावून त्यात दूध घातले जाते. कोमट दुधात दही तयार करणारे जीवाणू झपाट्याने वाढतात आणि ते किण्वन प्रक्रिया सुरू करतात.

किण्वन प्रक्रिया म्हणजे काय?

जीवाणूंमार्फत दुधातील Lactose चे रुपांतर Lactic Acid मध्ये केले जाते. या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात. Lactose ही दुधातील एक प्रकारची साखर असते. त्यानंतर Casein तयार होते. म्हणजेच दूध घट्ट होते. यालाच दही म्हणतात. या प्रक्रियेला ४ ते ५ तास लागतात.

योगर्ट बनवण्याची प्रक्रिया देखील दह्याप्रमाणेच असते. फक्त योगर्ट बनवताना विरजनासाठी योगर्टच घ्यावे लागते.

दही आणि योगर्टमधील मुख्य फरक

दही तयार होण्यासाठी किण्वनची जी प्रक्रिया होते ती Lactobacillus या जीवाणूंमुळे होते. हे जीवाणू ही किण्वनाची प्रक्रिया पार पाडतात. तर योगर्टमध्ये Lactobacillus Bulgaricus आणि Streptococcus Thermophilus हे जीवाणू किण्वनाची प्रक्रिया पार पाडतात.

या व्यतिरिक्त असलेले फरक

दही मुख्यत्वे गाय, म्हैस, शेळीच्या दुधापासून बनवले जाते. तर योगर्ट हे गायीच्या दुधापासून प्रामुख्याने बनवले जाते. याशिवाय घोडी, मेंढी, सांडणी, म्हैस आणि याक यांच्या दुधापासून देखील बनवले जाते. याशिवाय सोयाबीनच्या दुधापासूनही ते तयार केले जाते.

फॅट

दही हे जास्त फॅट असलेल्या दुधापासून बनवले जाते. तर योगर्टसाठी कमी फॅट असलेल्या दुधाचाच वापर केला जातो. यामुळे दही आणि योगर्ट यांच्यातील फॅटचे प्रमाण वेगवेगळे असते. दही आणि योगर्ट यांच्या चवीतील मुख्य फरक म्हणजे दही योगर्टपेक्षा जास्त आंबट असते.

दही आणि योगर्ट पैकी जास्त पौष्टिक काय?

दही आणि योगर्टची फक्त किण्वन प्रक्रिया वेगवेगळ्या जीवाणूंपासून केली जाते. मात्र, दोघांमधील प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्व ब १२ हे देखील जवळपास सारख्याच प्रमाणात असते. त्यामुळे दोन्ही आरोग्यासाठी चांगलेच असतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती