Pixabay
लाईफस्टाईल

Monsoon Health Tips: पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी काय खावे आणि काय टाळावे?

Tejashree Gaikwad

What to Eat and Avoid in Monsoon : पावसाळा सुरू होण्‍यासह उन्‍हाळ्यातील उकाड्यापासून उत्‍साहवर्धक व अत्‍यावश्‍यक दिलासा मिळतो, पण त्‍यासोबत आरोग्‍यविषयक आजारांमध्‍ये देखील वाढ होते. हवामान बदल आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे लोकांना डेंग्‍यू, टायफॉईड, गॅस्ट्रोइंटेन्‍स्‍टीलन संसर्ग, श्‍वसनविषयक समस्‍या व त्‍वचेच्‍या समस्‍या अशा विविध आरोग्‍यविषयक आजारांचा सामना करावा लागतो. मान्‍सूनचा रोगप्रतिकारशक्‍तीवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्‍यामधून संतुलित व पौष्टिक आहाराचे सेवन करण्‍याचे महत्त्व दिसून येते. एमबीबीएस व न्‍यूट्रिशनिस्‍ट डॉ. रोहिणी पाटील दैनंदिन आहारामध्‍ये बदाम, ताजी फळे व हंगामी भाज्‍या अशा पोषण-संपन्‍न फूड्सचा समावेश करण्‍याचा सल्‍ला देतात. हे पदार्थ आवश्‍यक पौष्टिक घटक आहेत, जे शरीरातील ऊर्जा वाढवण्‍यासोबत रोगप्रतिकारशक्‍ती देखील प्रबळ करतात. या लेखामधून डॉ. रोहिणी पाटील, यांच्याकडून जाणून घेऊयात पावसाळ्यादरम्‍यान सेवन करावे आणि सेवन करू नये अशा फूड्सबद्दल...

काय सेवन करावे?

बदाम

जीवनात लहान बदल केल्‍याने मोठा फरक घडून येऊ शकतो. उदाहरणार्थ, दररोज मूठभर बदामांचे सेवन आणि नियमितपणे व्‍यायाम केल्‍याने जीवनशैली आरोग्‍यदायी राहण्‍यासोबत एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते. बदाम आकाराने लहान असतील, पण त्‍यांच्‍यामध्‍ये कॉपर, झिंक, फोलेट व आयर्न यांसारखे १५ आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असल्‍यास पावसाळ्यादरम्‍यान होणारे संसर्ग व इतर आजारांशी लढण्‍यास मदत होते. तसेच, बदाम पावसाळ्यामधील कंटाळवाण्‍या दिवसांदरम्‍यान तुम्‍हाला उत्‍साही ठेवतात. डॉ. रोहिणी पाटील शरीराचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासह आनंदी राहण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करण्‍याची शिफारस करतात.

ताजी फळे

सफरचंद, डाळींब, बेरी व केळी अशा ताज्‍या फळांमध्‍ये व्हिटॅमिन्‍स व अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करतात आणि अन्‍नपचनास साह्य करतात. त्‍यांच्‍यामध्‍ये व्हिटॅमिन सी व फायबर देखील मोठ्या प्रमाणात असतात, जे पचनशक्‍ती आरोग्‍यदायी ठेवतात, बद्धकोष्‍ठतेला प्रतिबंध करतात आणि संसर्गांचा धोका कमी करतात. या फळांमध्‍ये बदामांचे तुकडे समाविष्‍ट केल्‍यास किंवा स्‍नॅक्‍स म्‍हणून बदामांचा सेवन केल्‍यास आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते. बदाम प्रथिनांचे संपन्‍न स्रोत आहेत, जे शरीराला ऊर्जा देण्‍यासोबत स्‍नायूबळ वाढवण्‍यास व कायम राखण्‍यास देखील मदत करतात.

व्‍हेजीटेबल सूप आणि हर्बल टी

बदलत्‍या हवामानासह आपले शरीर आरामदायी व उबदार ठेवणे महत्त्वाचे आहे. व्‍हेजीटेबल सूप सहजपणे पचते, शरीराला उबदार ठेवण्‍यास मदत करते, रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते आणि आवश्‍यक हायड्रेशन देते. तसेच आल्‍याची चहा, तुलसी चहा व गवती चहा त्‍यांच्‍या दाह-विरोधी गुणधर्मांमुळे गुणकारी आहेत आणि संसर्गांना प्रतिबंध करण्‍यास मदत करू शकतात. गरमागरम सूप किंवा हर्बल टी घसा खवखवण्‍यापासून आराम देऊ शकते आणि सामान्‍य सर्दीच्‍या लक्षणांना दूर करू शकते. त्‍यांच्‍यामध्‍ये नैसर्गिक अॅण्‍टीबॅक्‍टेरिअल व अॅण्‍टीव्‍हायरल गुणधर्म असतात.

काय सेवन करू नये?

जंक फूड

पावसाळ्यादरम्‍यान अनारोग्‍यकारक रस्‍त्‍यावरील फूड, पचायला जड जाणारे व तेलकट पदार्थ सेवन न करणे महत्त्वाचे आहे, कारण त्‍यामुळे पचनशक्‍तीमध्‍ये बिघाड होऊ शकतो आणि अन्‍न व पाण्‍यामार्फत होणारे आजार होण्‍याची शक्‍यता वाढू शकते. विशेषत: शिळ्या तेलामधील तळलेल्‍या पदार्थांच्‍या सेवनामुळे आतड्यांना सूज येणे, अपचन होऊ शकते, तसेच अन्‍न विषबाधेचा धोका वाढू शकतो. या हवामान बदलादरम्‍यान पोटातील संसर्गांना प्रतिबंध करण्‍यासाठी, पचनशक्‍ती आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी ताजे बनवलेल्‍या आहाराचे सेवन करण्‍याचा सल्‍ला दिला जातो.

शिळे किंवा उरलेले अन्‍न

पावसाळ्यादरम्‍यान उरलेल्‍या अन्‍नामध्‍ये जीवाणू झपाट्याने वाढू शकतात, ज्‍यामुळे अन्‍न विषबाधा होऊ शकते. यावर प्रतिबंध म्‍हणून शिळे अन्‍न सेवन करणे टाळा आणि उरलेले अन्‍न हवाबंद डब्‍यांमध्‍ये स्‍टोअर करून रेफ्रिजरेटरमध्‍ये ठेवा. तसेच, रेफ्रिजरेटरमध्‍ये ठेवलेले उर्वरित अन्‍न एक ते दोन दिवसांमध्‍ये सेवन करा, ज्‍यामुळे त्‍यांची सुरक्षितता व ताजेपणाची खात्री मिळेल.

हिरव्‍या पालेभाज्‍या व कच्‍च्‍या भाज्‍या

पावसाळ्यादरम्‍यान विशिष्‍ट हिरव्‍या पालेभाज्‍या व कच्‍च्‍या भाज्‍या खाताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण दमट वातावरणामुळे भाज्‍या दूषित होण्‍याचा आणि जीवाणू वाढण्‍याचा उच्‍च धोका असतो. पालक, कोबी व लेट्यूस यांसारख्‍या भाज्‍या कच्‍च्या किंवा काही प्रमाणात शिजवून सेवन केले जातात, ज्‍यामुळे या भाज्‍या संभाव्‍य घातक जीवाणू काढून टाकण्‍यासाठी पूर्णपणे स्‍वच्‍छ धुतल्‍या जात नाही तोपर्यंत सेवन करू नये. पूर्णपणे शिजवल्‍या जाणाऱ्या आणि स्‍वच्‍छ व विश्‍वसनीय स्रोतांकडून मिळवल्‍या जाणाऱ्या भाज्‍यांची निवड करणे सुरक्षित आहे, ज्‍यामुळे पावसाळ्यादरम्‍यान अन्‍नामार्फत होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

बदलत्‍या हवामानादरम्‍यान या आहारविषयक सूचनांचे पालन केल्‍यास एकूण आरोग्‍य उत्तम राहू शकते आणि शरीराचे सर्दी, खोकला, पचनविषयक समस्‍या अशा सामान्‍य हंगामी आजारांपासून संरक्षण होऊ शकते, जे दमट व अनपेक्षित वातावरणामध्‍ये होतात.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला