ब्रेकफास्टसाठी बेस्ट! पालक, चीज आणि व्हीट ब्रेडपासून बनवा हेल्दी सँडविच, वाचा रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

ब्रेकफास्टसाठी बेस्ट! पालक, चीज आणि व्हीट ब्रेडपासून बनवा हेल्दी सँडविच, वाचा रेसिपी

अवघ्या २५ मिनिटांत तयार होणारे हे होल व्हीट ब्रेड स्पिनॅच सँडविच चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधणारे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल, तर होल व्हीट ब्रेड स्पिनॅच सँडविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पालक, चीज आणि हर्ब्सचा वापर करून तयार होणारे हे सँडविच चवदार तर आहेच, शिवाय शरीराला आवश्यक पोषक घटकही पुरवते. अवघ्या २५ मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

साहित्य :

  • १ पॅक बेबी पालक (Baby Spinach)

  • २ टीस्पून ताजी पार्सली (हिरव्या पानांचं सुगंधी हर्ब)

  • १ लसूण पाकळी

  • १/४ कांदा

  • १/४ टीस्पून काळी मिरी पूड

  • २ टीस्पून ऑलिव्ह ऑईल

  • २ टेबलस्पून मीठ नसलेले बटर

  • ६ टेबलस्पून चीज

  • ४ स्लाइस होल व्हीट ब्रेड

  • ४ स्लाइस चीज

कृती :

पालक, पार्सली, लसूण आणि कांदा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कढईत ऑलिव्ह ऑईल गरम करून कांदा आणि लसूण परतून घ्या. त्यानंतर पालक व हर्ब्स घालून २ ते ३ मिनिटे शिजवा. एका भांड्यात चीज आणि काळी मिरी एकत्र करून मऊ मिश्रण तयार करा.

ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावा. त्यावर चीजचे मिश्रण पसरवा. नंतर पालकाचे मिश्रण घालून चीज स्लाइस ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाका. तवा किंवा सँडविच ग्रिल गरम करून सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम सँडविच तिरपे कापून टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी किंवा सूपसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक प्रोटीनसाठी पनीर किंवा उकडलेले चिकन घालू शकता.

  • चीजचे प्रमाण कमी करून रेसिपी आणखी हेल्दी बनवू शकता.

  • बेबी पालक नसेल तर साधा पालक वापरू शकता.

  • सँडविच अधिक कुरकुरीत हवे असल्यास ग्रिल करताना थोडे बटर लावा.

  • मुलांसाठी बनवत असाल तर त्यात कॉर्न किंवा किसलेले गाजरही घालू शकता.

हे सँडविच खाण्याचे फायदे

  • फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत

  • पचनक्रिया सुधारण्यास मदत

  • शरीराला ऊर्जा मिळते

  • वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त

  • लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सचा पुरवठा करते

अवघ्या २५ मिनिटांत तयार होणारे हे होल व्हीट ब्रेड स्पिनॅच सँडविच चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधणारे आहे.

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा