हिवाळ्यात शरीराला अधिक उष्णता आणि ऊर्जा लागते. या काळात योग्य आहार घेतल्यास सर्दी-खोकला, थकवा आणि अशक्तपणा टाळता येतो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात अंडी खाणे आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते.
आवश्यक पोषक तत्त्वे
अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत असून ती शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात. थंड हवामानात नियमितपणे अंडी खाल्ल्याने शरीर मजबूत राहण्यास मदत होते.
स्नायू मजबूत होण्यास मदत
हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते, ज्यामुळे थंडीचा परिणाम कमी जाणवतो. तसेच, अंड्यातील प्रथिने स्नायू मजबूत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. सकाळी नाश्त्यात अंडी खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
अंड्यांमध्ये व्हिटॅमिन D, B12 आणि झिंकसारखी पोषक तत्त्वे असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गाचा धोका कमी होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशावेळी अंड्यातील पोषक घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठीही अंडी फायदेशीर मानली जातात. कमी कॅलरी आणि जास्त प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात अंड्यांचा समावेश केला जातो.
नीट उकडूनच खा
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, अंडी नेहमी नीट उकडूनच खावीत आणि त्यांचे प्रमाणात सेवन करावे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास अंड्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.