Women's Day Special : आर्थिक नियोजन कसे करावे? महिलांसाठी खास बचत टिप्स प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
लाईफस्टाईल

Women's Day Special : आर्थिक नियोजन कसे करावे? महिलांसाठी खास बचत टिप्स

घराचा कारभार हा मुख्यत्वे स्त्रियांच्या हातात असतो. त्यामुळे कुटुंबाच्या उत्तपन्नातून घरखर्च कसा भागवायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. अनेक वेळा बचत करायची असते. मात्र, बचत होत नाही. आजच्या महागाईच्या काळात तर महिलांना बचत कशी करावी हा प्रश्न मोठा आहे. महिलांसाठी बचत करण्यासाठी या काही खास टिप्स

Kkhushi Niramish

घराचा कारभार हा मुख्यत्वे स्त्रियांच्या हातात असतो. त्यामुळे कुटुंबाच्या उत्तपन्नातून घरखर्च कसा भागवायचा हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. अनेक वेळा बचत करायची असते. मात्र, बचत होत नाही. आजच्या महागाईच्या काळात तर महिलांना बचत कशी करावी हा प्रश्न मोठा आहे. महिलांसाठी बचत करण्यासाठी या काही खास टिप्स

बजेट तयार करा

तुमच्या हाताता किती पैसा आहे. कुटुंबात किती सदस्य आहे. यानुसार तुमच्या घरचे मासिक बजेट तयार करा. खर्चाचा मागोवा घ्या.

अनावश्यक खर्च टाळा

मासिक खर्चाची लिस्ट तयार करा. त्यानुसार खर्च करण्याची सवय लावा. त्यापेक्षा अधिक खर्च होणार नाही याची काळजी घ्या. खर्चाची लिस्ट तयार करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. काय जास्त महत्त्वाचे आहे. त्याकडे लक्ष द्या.

पैशांचे व्यवस्थापन करायला शिका

तुम्ही भाकरी करता. तुम्हाला माहिती असते भाकरी फिरवली नाही की करपते. तसेच काहीसे पैशांचे असते. पैसा फिरवला नाही की वायफळ खर्च होतो. त्यामुळे पैसा कसा फिरवायचा. योग्य जागी योग्य वेळी किती खर्च करायचा, कुठे गुंतवणूक करायची, जाहिरातींच्या भूल थापांना बळी न पडता. क्रेडीट कार्ड, युपीआय ऑफर्स कशा प्रकारे वापराव्या यासाठी आवश्यक पैशांचे व्यवस्थापन कौशल्य विकसित करून घ्या.

आणीबाणीच्या गरजेसाठी पैसा राखीव ठेवा

आयुष्यात अनेक वेळा अचानकपणे काही प्रसंग उद्भवतात. अशा वेळ येऊ नये मात्र, त्यासाठी तयार राहणे देखील आवश्यक असते. अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी काही पैसे राखीव ठेवा.

स्वतःला अपडेट ठेवा

बदलत्या जगानुसार स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. आज मार्केटमध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुठे कशी आणि किती बचत करावी याचे ज्ञान मिळवून योग्य ती बचत करायला शिका.

कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या

कुटुंबात जर कोणी ज्येष्ठ असेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. त्यांनी अशा संपूर्ण आयुष्य कौटुंबिक खर्चाचे नियोजन केलेले असते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन हे अनेक वेळा मोलाचे ठरते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री