लाईफस्टाईल

Zika Virus Alert: झिका व्‍हायरसचा वाढतोय धोका! कशी काळजी घ्याल? जाणून घ्या लक्षणे

Tejashree Gaikwad

zika virus symptoms: मान्‍सून उन्‍हाळ्याच्‍या उकाड्यापासून अत्‍यावश्‍यक दिलासा देण्‍यासोबत झिका सारखे अनेक वेक्‍टर-जनित आजार (डासांमार्फत होणारे आजार) घेऊन येतो. सतत पडणारा पाऊस, परिणामी पाणी साचणे आणि आर्द्रता हे डासांची पैदास होण्‍यास अनुकूल बनतात, ज्‍यामुळे झिका सारख्‍या विषाणूंचा प्रसार होतो. देशाच्‍या अनेक भागांमधून झिका विषाणूची प्रकरणे निदर्शनास आली आहेत आणि केंद्र सरकारने राज्‍यांना सतर्क करण्‍यासोबत सतत दक्ष राहण्‍यास सांगितले आहे. पण, लोकांनी देखील सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे आणि या विषाणूबाबत, तसेच विषाणूचा प्रसार का होतो आणि संसर्ग झाल्‍यास कोणता उपचार केला जाऊ शकतो याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील इंटर्नल मेडिसीनच्‍या संचालक आणि इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. अनिता मॅथ्‍यू यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या.

झिकाबाबत माहित असणे आवश्‍यक असलेल्‍या गोष्‍टी

झिकाचे संक्रमण होण्‍यास कारणीभूत असलेला डास डेंग्‍यू व चिकनगुनिया यांसारखे इतर वेक्‍टर-जनित आजार होण्‍यास कारणीभूत असलेल्‍या डासांसारखारच असतो. झिका विषाणूने पीडित रूग्‍णांमध्‍ये डेंग्‍यू व चिकनगुनियासारखीच लक्षणे दिसून येतात. या स्थितीवर सामान्‍यत: स्‍वत:हून प्रतिबंध करता येतो, जेथे लक्षणांनुसार उपचार केला जातो. पण, झिका विषाणूमुळे गरोदर महिलांमध्‍ये गंभीर गुंतागूंती निर्माण होऊ शकतात, जन्‍माला न आलेल्‍या बाळामध्‍ये मायक्रोसेफली (मेंदूचे अपंगत्‍व) किंवा कॉन्‍जेनिटल झिका सिंड्रोम होऊ शकतो.

तसेच, झिका विषाणू लैंगिक संभोग, रक्‍त व रक्‍त उत्‍पादनांचे संक्रमण आणि अवयव प्रत्‍यारोपणाद्वारे देखील पसरू शकतो. आज, लोकांना इतर वेक्‍टर-जनित आजार आणि कोविड-१९ मधील झिका लक्षणांबाबत माहित असणे आवश्‍यक आहे.

लक्षणे

• सौम्‍य ते उच्‍च ताप

• कन्‍जंक्‍टीव्‍हायटस (डोळे येणे)

• त्‍वचेवर पुरळ/ अॅलर्जी

• डोकेदुखी

• स्‍नायूदुखी व सांधेदुखी

• मळमळ व उलट्या होणे

• कधी-कधी शरीराच्‍या वरील व खाली भागामध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे

संरक्षणासाठी पालन करावयाच्‍या काही सूचना

कोणत्‍याही प्रकारे भितीचे वातावरण निर्माण न करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: आवश्‍यक खबरदारी घेतली पाहिजे. पण, लक्षणांसंदर्भात कोणतेही बदल आढळल्‍यास त्‍वरित वैद्यकीय उपचार करणे आवश्‍यक आहे. कारण विलंब केल्‍यास गुंतागूंती वाढू शकतात. तसेच, कोणत्‍याही आजारावर स्‍वत:हून औषधोपचार करू नका आणि सुरक्षित राहण्‍यासाठी सर्व संबंधित उपयायोजनांचे पालन करा.

'हे करा' आणि 'हे करू नका'

या विषाणूसह निदान झालेल्‍या व्‍यक्‍तींना घरामध्‍येच राहा, शक्‍यतो आराम करा आणि भरपूर पाणी प्‍या. गरोदर महिलांनी विशेषत: संसर्गित क्षेत्रांमध्‍ये प्रवास करणे टाळावे. कोणत्याही विशिष्‍ट उपचाराची गरज नाही, कारण ही स्‍वत:हून प्रतिबंध करता येणारी स्थिती आहे.

झिका विषाणूपासून संसर्ग होण्‍याला प्रतिबंध करण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे डास चावण्‍याचा धोका कमी करणे. डास सामान्यत: दिवसा चावतात, ज्‍यामुळे तुमची राहण्‍याची जागा नेहमी स्‍वच्‍छ असण्‍याची आणि कुठेही पाणी साचणार नाही याची खात्री घ्‍या. सर्व भांडी व बादल्‍या रिकाम्या असल्‍याची खात्री घ्‍या, ज्‍यामुळे अशा पाण्‍यामध्‍ये डासांची पैदास होणार नाही. काही पालन केले जाऊ शकतात असे

खबरदारीचे उपाय

• विशेषत: बाहेर जात असताना फुल-स्‍लीव्‍ह कपडे परिधान करा, तसेच मुले बाहेर खेळायला जात असतील तर त्‍यांना देखील फुल-स्‍लीव्‍ह कपडे परिधान करा.

• डासांचा प्रादुर्भाव असलेल्‍या भागात राहत असाल तर दरवाजे व खिडक्‍या बंद ठेवण्‍याची खात्री घ्‍या.

• डास/किटकांपासून संरक्षण करणाऱ्या प्रतिबंधकांचा वापर करा.

• फक्‍त उकळलेले / प्‍युरिफाईड (शुद्ध) पाणी प्‍या.

• घरामध्‍ये बनवलेले ताजे अन्‍न सेवन करा आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा.

• तापावर उपचार करण्‍यासाठी अॅस्पिरिन गोळ्या घेणे टाळा आणि २ दिवसांहून अधिक लक्षणे राहिल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

• तुमचे घर आणि घरातील जाता हवेशीर ठेवा.

• विशेषत: बाहेरून आल्‍यानंतर हाताने नाक व तोंडाला स्‍पर्श करू नका.

• नेहमी मुलभूत स्‍वच्‍छता राखा आणि शक्‍य असल्‍यास वारंवार हात स्‍वच्‍छ धुवा.

• तुमची रोगप्रतिकारशक्‍ती कमकुवत असल्‍यास गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळा, ज्‍यामुळे व्‍हायरल संसर्गांचा धोका कमी होईल.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा