महाराष्ट्र

वर्ध्यात १५ हजार रोजगार उपलब्ध होणार; फडणवीस यांचा विश्वास, वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्य शासनाचा सामंजस्य करार

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटींची गुंतवणूक करून जवळपास १५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : गुंतवणूक वाढीसह रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत वर्धा जिल्ह्यात वस्त्रोद्योग गुंतवणुकीवर भर दिला आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटींची गुंतवणूक करून जवळपास १५ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, भविष्यात वर्धा जिल्ह्याचे रुपडे पालटणार असून वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत मे. ओफए बी टेक प्रा. लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्य शासनाचा मे.ओफए बी टेक प्रा. लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार फडणवीसांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग, तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रा, योगेश मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.

नवीन उद्योगांना मिळणार बळकटी

वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी -सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहेत.

महिला कारागिरांना रोजगार उपलब्ध

प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजुबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर उद्योगात होईल. त्याचबरोबर या उद्योगामुळे येथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येईल.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती