महाराष्ट्र

३.५ टन सोने, १४० टन लाल चंदन पकडले ; वर्षभरात तपास यंत्रणांची कामगिरी

२०१४ ते २०२२ दरम्यान अमली पदार्थ पकडल्याचे ३१७२ गुन्हे नोंदवले गेले. २००६ ते २०१३ दरम्यान १२५७ गुन्हे नोंदवले होते.

प्रतिनिधी

मुंबई : देशात सोन्याची व अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. गेल्या वर्षभरात ३.५ टन सोने, १८ कोटींच्या सिगारेट, १४० मेट्रिक टन लाल चंदन, ९० टन हेरॉईन आदी मुद्देमाल तपास यंत्रणांनी पकडला आहे.

‘फिक्की कॅसकेड’ने ‘अवैध बाजार, वित्तीय पुरवठा, संघटित गुन्हेगारी व दहशतवाद’ यावर अहवाल सादर केला. चुकीच्या पद्धतीने आयात आणि निर्यातीमुळे भारताला १३ अब्ज डॉलर्सचा महसुली तोटा होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांच्यासमोर अवैध व्यापाऱ्याचे मोठे आव्हान आहे. कारण अवैध व्यापाऱ्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. कर चोरी, तस्करी यामुळे भारताच्या आर्थिक स्थिरतेला आव्हान मिळत आहे.

अवैध व्यापार व आयात करताना चालणाऱ्या गैरव्यवहारातून ९ अब्ज डॉलर्सचा संभाव्य महसूल तोटा, तर ‘व्हॅट’ वसूल न केल्याने ३.४ अब्ज डॉलर्सचा तोटा होऊ शकतो.

अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

अमली पदार्थांचे उत्पादन होणाऱ्या भागापासून भारताचे भौगोलिक स्थान अत्यंत जवळचे आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. म्यानमार, लाओस व थायलंडला या सुवर्ण त्रिकोणात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे उत्पादन होते, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान व इराण ही सुवर्ण चंद्रकोर आहे. या भागातून अमली पदार्थांची वाहतूक व वितरण होते.

अमली पदार्थ पकडण्याचे प्रमाण वाढले

२०१४ ते २०२२ दरम्यान अमली पदार्थ पकडल्याचे ३१७२ गुन्हे नोंदवले गेले. २००६ ते २०१३ दरम्यान १२५७ गुन्हे नोंदवले होते. याप्रकरणी ४८८८ जणांना अटक झाली असून ३.३३ लाख किलो अमली पदार्थ पकडले. त्याची किंमत २० हजार कोटी रुपये आहे.

विविध सूत्रांनी व सरकारी माहितीवरून हा अहवाल तयार केला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन