महाराष्ट्र

संभाजी भिंडेंच्या अडचणी वाढणार! महात्मा गांधींविषयी केलेल्या विधानाविरोधात अखेर गुन्हा दाखल

नवशक्ती Web Desk

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमची त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच पुरोगामी संघटनांनी राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला असून संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडिल नसून त्यांचे खरे वडिल हे मुस्लीम जमिनदार होते. तसंच मोहनदास यांच्या सांभाळ व शिक्षण देखील त्याच मुस्लीम पालकांनी केल्याचा दावा भिडे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटल असून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांनी त्यांना अटकेची मागणी केली आहे.

भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. भिडेंनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्याविरोधात यवतमाळ शहरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर चंद्रपूर येथील भिडे यांच्या बैठक विरोधकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्तक होतं बैठक उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत