महाराष्ट्र

पुण्यातील विद्यार्थींनींच्या वसतिगृहाला भीषण आग; शैक्षणिक साहित्य जाळून खाक

नवशक्ती Web Desk

पुणे येथील रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. वस्तीगृहात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या मुख्यालयातील आणि कसबा केंद्रातील बंब ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले होते. हे वसतिगृह तीन मजल्याचे होते. ही आग वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये लागली होती.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत जाऊन आगीवर पाण्याचा जोरदार मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील इतर शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व काही वस्तू पूर्णपणे जळाल्या आहेत. ही आग खोलीमधील हिटरमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं जातं आहे. वसतिगृहात आग लागल्याचं समजताच कर्मचाऱ्यांनीही तेथे उपलब्ध असलेल्या १८ अग्निरोधक उपकरणांचा (फायर एक्स्टिंगविशर) वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस