@col_chaubey/X
महाराष्ट्र

दुर्मीळ गिधाडांचा गारेगार प्रवास...मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ३४ गिधाडांचे हस्तांतरण

‘वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर अतिशय दुर्मीळ प्रजातीमध्ये मोडणारी लांब चोचीची व पांढऱ्या पाठीची गिधाडे महाराष्ट्राच्या वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

Swapnil S

मुंबई : ‘वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर अतिशय दुर्मीळ प्रजातीमध्ये मोडणारी लांब चोचीची व पांढऱ्या पाठीची गिधाडे महाराष्ट्राच्या वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. महाराष्ट्र वन विभागाने विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पांमध्ये गिधाडांच्या सॉफ्ट रिलीजसाठी तीन प्री-रिलीज पिंजरे उभारले असून पुढील दोन दिवसांत ही गिधाडे त्यांच्या नियोजित पिंजऱ्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

देशात पिंजोर, भोपाळ, राजाभटखावा (पश्चिम बंगाल) व राणी, गुवाहाटी (आसाम) या चार ठिकाणी ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ने जटायू संवर्धन प्रजनन केंद्रे स्थापन केली आहेत. महाराष्ट्रात दाखल झालेली ही गिधाडे २ ते ६ वर्षे वयोगटातील असून, त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यायोग्य असल्याची खात्री केली गेली आहे. तीन ठिकाणी गिधाडांचे समप्रमाणात वितरण करण्यात आले असून त्यामागे पर्यावरणीय समतोल राखण्याचा मुख्य उद्देश आहे. या हस्तांतरणाने नैसर्गिक प्रजोत्पादनास हातभार लागेल व प्रत्येक ठिकाणी लिंग समतोल सुनिश्चित होईल. या गिधाडांना स्वतंत्र लाकडी खोक्यातून अगदी सुरक्षितरीत्या आणण्यात आले, त्यांना प्रवासापूर्वी दोन दिवस आधीच आहार देण्यात आला होता, हे विशेष.

योग्य तापमान आणि वायुवीजन राखता येईल याची पुरेपूर काळजी घेऊन हे पक्षी वातानुकूलित तीन टेम्पो ट्रॅव्हलर्समधून हलविण्यात आले, या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व कोलसा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन क्षेत्रपाल रुणदान काटकर यांनी केले. त्यांना पीटीआरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक बारडे, सोसायटीचे वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ मनन महादेव आणि दोन वनरक्षक यांची साथ होती. हरियाणा व महाराष्ट्रचे प्रधान वन्यजीव रक्षक विवेक सक्सेना व श्रीनिवास राव, तसेच BNHS चे संचालक किशोर रिठे यांनी संपूर्ण कारवाईचे निरीक्षण व मार्गदर्शन केले.

दुर्मीळ गिधाडांची संख्या पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना हातभार

भारताच्या गिधाड पुनर्प्रवेश कार्यक्रमाचा भाग म्हणून लांब चोचीची २० गिधाडे व पांढरी पाठ असलेली १४ गिधाडे मिळून एकूण ३४ प्रजोत्पन्न गिधाडांचे पिंजोर येथून राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांमध्ये यशस्वी हस्तांतरण करण्यात आले आहे. या हस्तांतरणामुळे मध्य भारतातल्या अतिशय दुर्मीळ गिधाडांची संख्या पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागणार आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video