भाजपने भागवतांचे तरी ऐकावे - अभिजीत दीपके (Photo-X)
महाराष्ट्र

भाजपने भागवतांचे तरी ऐकावे - अभिजीत दीपके

कॉकराेच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी भाजपला त्यांचे राजकीय ‘पालक’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : कॉकराेच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी भाजपला त्यांचे राजकीय ‘पालक’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या वैचारिक मार्गदर्शकामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोहन भागवत यांनी मुंबईत जेन-झी तरुणांशी संवाद साधल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपके यांनी आपली भूमिका मांडली. नीट परीक्षा गैरव्यवहाराविरोधात जंतरमंतरवर झालेल्या युवा आंदोलनामागे रास्त आणि स्पष्ट कारणे होती, ही भागवत यांनी दिलेली कबुली भाजपने मान्य केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गुरुवारी तरुण पिढीचे जोरदार समर्थन करताना भागवत म्हणाले होते की, युवा पिढीच्या तक्रारी आणि मागण्या रास्त आहेत, तसेच त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे. तरुणांनी आंदोलन केले म्हणजे ते 'देशविरोधी' ठरत नाहीत.

मोहन भागवत यांचे सर्वात महत्त्वाचे विधान हे होते की, आंदोलन करणाऱ्या तरुणांना देशविरोधी म्हणू नका, त्यांच्या समस्या रास्त आहेत. याआधी भाजप अध्यक्षांनी आम्हाला 'व्हायरस' म्हटले होते आणि माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'दहशतवाद्यांची बी-टीम' असे संबोधले होते. आता तरी त्यांनी मोहन भागवत यांचे ऐकावे, कारण ते भाजपचे मार्गदर्शक आणि पालक आहेत, असे दीपके म्हणाले. भाजप आणि भागवत यांच्या भूमिकेत अजिबात समन्वय उरलेला नाही, असा दावा करत दीपके म्हणाले की, भागवत यांनी स्वतः भाजपशी या विषयावर थेट बोलले पाहिजे.

दीपकेंवर पोलिसांची पाळत?

कॉकराेच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी पोलिसांना खडेबोल सुनावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शुक्रवारी त्यांच्या घराच्या अंगणात नागरिकांना भेटण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी एक पोलीस अधिकारी आलेल्या नागरिकांना बाहेर काढत होता. अभिजीत दिपके यांनी "लोकांना भेटू द्या" अशी विनंती केली. त्यावर पोलीस अधिकाऱ्याने सर्वांना एकदाच आत जाऊ द्या असे विधान केल्याने अभिजीत दीपके संतापले. यामुळे दीपके यांच्यावर पाळत ठेवली जात आहे की काय असा संशय निर्माण झाला.

अभिजीत दीपके यांनी थेट सर्वांच्या समोरच त्या पोलीस अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. मी कोणाला भेटायचे हे पोलिसांनी मला सांगू नये, असे ते म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

HIV, सिफिलिस तपासणी अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा रक्तपेढ्यांना इशारा

Mumbai : चांदीपुरा विषाणूचा धोका; पालिका ‘अलर्ट’, कस्तुरबा रुग्णालयात १० बेड्स आरक्षित

प्रज्ञानंदची पहिल्यांदाच बाजी! सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत सिंदारोव्हवर सरशी

पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी ४२ गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

दिल्लीत आंदोलनांवरून न्यायालयाची नाराजी