महाराष्ट्र

देवदर्शनाला निघालेल्या नवदांम्पत्यांवर काळाचा घाला ; रिक्षा विहीरीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू

लग्नानंतर नवदांम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जातं असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळव्यक्त केली जात आहे.

नवशक्ती Web Desk

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे सासवड इथं एका रिक्षाला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात, नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नुकतंच लग्न झालं आणि लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जातं असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळव्यक्त केली जात आहे.

पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरावके मळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये जाऊन पडली. अद्याप अपघात कोणत्या कारणाने झाला याची माहिती मिळाली नाही. मात्र, संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवदांम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर रिक्षातील सर्वांशी कुटुंबाचा संपर्क तुटला होता. आज पहाटे व्यायामाला जाणाऱ्या इथल्या मुलांना विहिरीतून वाचवा, वाचवा असं कोणीतरी ओरडत आहे असा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी ताबोडतोब जाऊन हा गोष्टीचा शोध घेतला. पोलिसांनी या अपघातातील दोघांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते