महाराष्ट्र

येवल्यात मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करणारे कार्यकर्तेत जेसीबीतून कोसळले ; ग्रामीण रुग्णालयात दाखल

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र भराचा दौरा करत आहेत. जरांगे ज्या ठिकाणी जात आहेत. मराठा समाजाकडून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. मात्र, मनोज जरांगे हे येवल्यात आले असता त्याठिकाणी एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. येवल्यात मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून खाली कोसळल्याने कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या जखमी कार्यकर्त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची येवल्यात जाहीर सभा पार पडणार आहे. यासाठी पंचक्रोशीतील मराठा समजा मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणावर जमत आहे. यावेळी जरांगेचं स्वागत करताना ही दुर्घटना घडली आहे.

जरांगे यांच स्वागत सुरु असताना, अचानक एका जेसीबीची समोरील बाजून असलेली लोडर बकेट खाली आल्याने जीसीबीवर असलेले चौघेही खाली पडल्याने अपघात झाला. यात बकेटमधील चारही जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना गावा गावात चौका चौकात जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. आज मनोज जरांगे हे नाशित जिल्ह्यात येवला येथे दाखल झाले आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जवळपास पंधरा ते सोळा जेसीबी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. या जेसीबींच्या बकेटमध्ये काही कार्यकर्तेत फुलांची उधळण करत होते. यावेळी बकेटवरुन जेसीबी ऑपरेटरचं नियंत्रण सुटल्याने चार कार्यकर्ते खाली कोसळले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आम्ही कुणबी असून ओबीसींमध्येच आहोत त्यामुळे ओबीसींमधूनच आरक्षण पाहिजे. आमच्या या मागणीला विरोध करणारे कोणी ओबीसी असतील तर त्याला अर्थ नाही. असं सांगत येवला येथील सभेचा रुट ठरला होता म्हणून जातो आहे. यात वेगळं काही नाही. समता परिषदेने विरोध केला, हा द्वेष का पसरवित आहेत. याचा अर्थ तुम्ही संविधानिक पदाचा गैर वापर केला जात आहे. चार दिवसात कायदा पारित होणार नसल्याने आम्ही त्यांना चाळीस दिवस दिले आहेत.१४ तारखेला एक महिला पूर्ण होतोय. त्यामुळे सरकारने गांभिर्याने घ्यावं, असं जरांगे पाटील म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा