महाराष्ट्र

नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशनकडून १० क्षयरुग्ण दत्तक

नवशक्ती Web Desk

नाशिक : जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिक, यांनी प्रधाममंत्री टीबी मुक्त अभियानांतर्गत १० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहाराचे वाटप केले. आतापर्यंत एकूण ३१ क्षयरुग्ण दत्तक घेऊन प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान 'निक्षय मित्र’ नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिक यांनी नाशिक शहर क्षयमुक्त करण्यासाठी मनपा क्षयरोग पथक नाशिक (टीयु) अंतर्गत मायको दवाखाना, दिंडोरी रोड, पंचवटी या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या १० क्षयरुग्णांना सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोग मुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने पोषण आहार देण्यास संमती दर्शविली आहे.

डॉ. अशोक करंजकर, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष, राजु व्यास यांचे माध्यमातून आज भागवत सप्ताह निमित्ताने हिरावाडी, पंचवटी येथे श्री. स्वामी इंद्रदेवजी महाराज यांचे हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आले, अशोक शर्मा, आशिष विश्वकर्मा, पंकज पाटील, स्वाती पाटील, चेनाराम चौधरी, मनोहर गौंड, सुखदेव गौंड, ललित गौंड, कुणाल वाणी, शामलाल गौंड यांनी क्षयरुग्ण दत्तक घेतले आहेत याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल जोशी, पंकज पाटील, भास्कर शिंदे, अक्षय सांत्राम, स्वाती पाटील, गुजी व्यास उपस्थित होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस