महाराष्ट्र

Ahmednagar: आष्टी रेल्वेला भीषण आग ; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र...

नवशक्ती Web Desk

आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरातील दोन डब्यांना आग लागली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.

अहमदनगरमधील शिराडोह परिसरातील रेल्वेला ही आग गालल्याची घटना घडली आहे. आग गाल्याचं समजताच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, आग एवढी भीषण होती की, त्यात रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.

ही आग कोणत्या कारणाने लागली याची चौकशी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आग विझवण्याचं काम सुरु आहे. या गाडीला प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याने प्रवाशी संख्या देखील कमी होती. त्यामुळे आग लागल्याची माहिती मिळताच सर्व प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं.

रेल्वेच्या दोन डब्यांना ही आग लागली असून आग पसरत असल्चाची माहिती समोर आली आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरु आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा