मुंबई : महायुतीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादावादी सुरू असून महायुतीत आपली ताकद दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यात मुरूड येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते मंगेश दांडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
दांडेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मुरूडमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मंगेश दांडेकर हे पुन्हा स्वगृही परतल्याने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.
मंगेश दांडेकर यांच्या समवेत महात्मा जोतिबा फुले सोसायटीचे चेअरमन अजित गुरव, शिंदे गटाचे नेते नितीन पवार, अमित कवळे, राकेश मसाळ, शिगरे-मुरूडचे माजी सरपंच हाफिजू कबले, बेलवडेचे माजी सरपंच कृष्णा म्हात्रे, राकेश चौगुले, विलास पाटील, निलेश पाडगे, इम्तियाज कडू आदींनी प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूडचे तालुकाध्यक्ष फैरोज घरटे, अलिबाग मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, मनोज अप्पा भगत, अजित कासार, हसमुख जैन उपस्थित होते.