महाराष्ट्र

शरद पवारांबद्दल बोलताना अजितदादा भावूक, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या वाटचालीत शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असं अजित पवार म्हणाले.

Suraj Sakunde

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज २५ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर पहिल्यांदाच हा वर्धापनदिन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मुंबईतील षन्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवारांबद्दल बोलताना अजितदादा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या वाटचालीत शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असं अजित पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले अजितदादा?

"आज राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना पक्षातील काही महत्त्वाचे नेते आपल्यासोबत नाहीत, याची खंत वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून २४ वर्ष पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो," असं अजित पवार म्हणाले. यादरम्यान त्यांचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगरमध्ये मेळावा-

अहमदनगरमधील न्यू आर्ट कॉलेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वर्धापन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसभेतील यशाचा विजयोत्सव साजरा करण्यात येणार असून विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली जाणार आहे. या मेळाव्याला पक्षाच्या नवनियुक्त खासदारांसोबत सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार या कार्यक्रमात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Mumbai : लोकलमध्ये मोबाईल गोंगाटाला ५ हजार दंड; रेल्वे प्रशासनाची कारवाईची तयारी; सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाचीही तरतूद

दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने जाहीर केलं दुसऱ्या मुलीचं नाव; दसऱ्याच्या मुहूर्तावर दाखवली लेकीची पहिली झलक

दिल्लीत रावणासोबत ३० फुटी झुरळाच्या पुतळ्याचेही दहन; आयोजकांचे आभार मानत अभिजीत दिपके म्हणाले...

Dussehra 2026 : मुंबईत रावणदहन कुठे पाहाल? गिरगाव चौपाटीसह ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख ठिकाणांची यादी

AI Photo Safety : मुलांचे फोटो AI ॲप्सवर अपलोड करताय? पालकांनो, आधी 'या' गोष्टी नक्की तपासा