महाराष्ट्र

महायुतीचे जागावाटप उद्या

Swapnil S

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाबाबत ९९ टक्के चर्चा पूर्ण झाली आहे. जागावाटपाबाबत महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. येत्या गुरुवारी, २८ मार्चला महायुतीची एकत्रित पत्रकारपरिषद होणार असून मुंबईत महायुतीच्या जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. आम्ही नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते, तर एमआयएमची एक जागा निवडून आली होती. मात्र, माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पद्धतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले.

महायुतीत गैरसमज नाहीत!

आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत, तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. उमेदवार बदलण्याच्या केवळ अफवा असून तुमच्या मनात जो आहे तो उमेदवारच तिथे देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच सुनेत्रा पवार यांनाच बारामतीतून उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.

शिवाजीराव आढळराव यांचा अजित पवार गटात प्रवेश

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने आढळरावांनी हाती घड्याळ बांधले आहे. जवळपास दोन दशकानंतर आढळराव पुन्हा स्वगृही परतले आहेत. आढळराव पाटील यांचा सामना आता डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे.

'भिडू' बोलून 'जग्गूदादा'ची नक्कल महागात पडणार! जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव; खटला केला दाखल

भीमा-कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांना मोठा दिलासा; SC ने दिला जामीन; उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार

PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात

वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद