महाराष्ट्र

महायुतीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; अजित पवारांकडून ७ जागांसाठी प्रयत्न

दोन दिवसात महायुतीच्या सर्व जागांच्या नावांची घोषणा होऊ शकते. शिंदेची शिवसेना १३ जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीतील जागावाटपाचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, पण अजुनही राहिलेल्या २८ जागांचा गुंता सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी ७ जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रविवारी उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी सात जागांची मागणी लावून धरल्याचे समजते.

सातारा, धाराशीव, बारामती, रायगड, शिरुर, परभणी, गडचिरोली या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. तर दुसरीकडे सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातारा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी केली होती, तर दुसरीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून तिकिट मिळावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, दोन दिवसात महायुतीच्या सर्व जागांच्या नावांची घोषणा होऊ शकते. शिंदेची शिवसेना १३ जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video